राज ठाकरेंकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान; सुजय विखेंनी घेतला ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

  • Written By: Published:
राज ठाकरेंकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान; सुजय विखेंनी घेतला ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

Sujay Vikhe Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईत (Mumbai) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या (Mahayuti) विजयावर शंका उपस्थित केली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सातवेळा आमदार झाले, सातवेळा सत्तर हजार मतांनी निवडून यायचे ते. त्यांचा या निवडणुकीमध्ये १० हजार मतांनी पराभव झालाच कसा?, असा सवाल त्यांनी केला. यावर आता माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी भाष्य केलं. राज ठाकरेंनी संगमनेरच्या (Sangamner) मतदारांचा अपमान केलाय, अशी टीका विखेंनी केली.

मोठी बातमी ! मविआच्या काळात फडणवीस, एकनाथ शिंदें यांना अडकवण्याचा कट? तपासासाठी एसआयटी गठीत 

सुजय विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे हे कधी संगमनेरला आलेले नाहीत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी संगमनेर दौरा करावा. त्यांनी केलेलं वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान आहे. राज ठाकरे संगमनेरमध्ये आले तर त्यांच्या लक्षात येईल की, आमची अपेक्षा चाळीस-पन्नास हजाराची होती. परंतु आम्ही 10 हजारापर्यंतच मताधिक्य घेऊ शकलो. संगमनेरची वास्तविकता राज ठाकरे ज्या दिवशी पाहतील, त्या दिवशी ते त्यांचं वक्तव्य मागे घेतील, असं विखे म्हणाले.

Santosh Deshmukh : कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसचा धनंजय मुंडेंवर निशाणा 

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज घटनेवरती बोलावं असं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले की, हिंदूंचा आणि प्रयागराज घटनेचा तसा काही संबंध नाही. हिंदू जागा झालाय हेच तुम्हाला प्रयागराजमध्ये पाहायला मिळालं. आजपर्यंत कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी कधीच होत नव्हती, फार गर्दी झाल्याकारणाने प्रशासन एका विशिष्ट प्रमाणामध्ये नियोजन केलं. परंतु गर्दी जास्त झाल्याने कुणाचंही सरकार असलं ते नियोजन कोलमडते आणि ती घटना घडली. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र, घडलेल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण कॉंग्रेस करत आहे, अशी टीका विखेंनी केली.

पुढं ते म्हणाले, काँग्रेसला जर असं वाटत असेल की, आपण असं बोलल्यानंतर हिंदूंचे मत आपल्याला मिळायला सुरू होतील तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे, असं सुजय़ विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube