लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका लागल्या. मात्र, विधानसभा निवडणुका राज ठाकरेंच्या मनसेने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ईडीच्या भीतीनेच राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र, मुंबईतील वरळीत झालेल्या आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईडीची स्टोरी भर सभेत सांगितलीयं.
करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल… सुरेश धस यांनी लावून धरलेलं प्रकरण काय? बुरखाधारी महिला कोण?
राज ठाकरे म्हणाले, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, तेव्हा मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस का आली त्यात कोहिनूरचा विषय होता. आमचा काय संबंध होता ते लोक काय बोलत होते ते कळत नव्हते. जे पैसे आले. त्यावर टॅक्स भरला आणि गेला. त्या कंपनीनेही टॅक्स भरला. आम्ही त्यातून बाहेर पडलो. ती गोष्ट आली तेव्हा सीएला बोलावलं. त्याला विचारलं काय झालं. तो म्हणाला, तुमच्या एका पार्टनरने तुमचा टॅक्स भरलाच नाही. त्याने बाहेरच्या बाहेर ते पैसे वापरले होते, असं लक्षात आलं.
मी विचारलं सीएला की आता काय करायचं ? तर तो म्हणाला की आता परत टॅक्स भरायचा. आम्ही परत सगळ्यांनी आपापला टॅक्स भरला, उगाच त्या झंझटीत कोण जाईल ? तिथेच तो विषय संपला, असा किस्सा त्यांनी सांगितला. पण आता एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि स्तुती करायला लागला? मला काय घेणं देणं त्याच्याशी. माझ्या डोक्यावर तलवार घेऊन नाही मी फिरत असं म्हणत राज ठाकरेंनी ईडीचा संपूर्ण किस्सा सांगत, त्या भीतीपोटी आपण कुणालाही पाठिंबा दिलं नसल्याचं स्पष्ट केलं.
हे बाकीच्यांसारखं नाही, सहा दिवस आधी मोदी म्हणतात 70 हजार कोटींचा घोटाळा केला आत टाकू. आम्हाला माहीत नव्हतं ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आत टाकूचा अर्थ हा होतो हे पहिल्यांदा कळलं,असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना महायुतीत घेण्याच्या मुद्यावरूनही टीकास्त्र सोडलंय.