मंत्रिमंडळ बैठक अन् व्हिसीद्वारे उपस्थिती, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? शंभूराज देसाईंनी स्पष्ट सांगितलं
Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे. मात्र राज्याची कमान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देण्यात आल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचे बातम्या समोर आले होते. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यानंतर देखील महायुतीमध्ये कधी शिवसेना (Shivsena) नेते तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नाराज असल्याचे बातम्या सुरूच आहे.
नुकतंच राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यातच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाही. ते या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (Video Conferencing) उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष अनुपस्थितीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे नाराज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे एकनाथ शिंदे या बैठकीला प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले नाही पण ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. ते नाराज नाही अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा
तर एकनाथ शिंदे नाराज नाही, ते माझ्याबरोबर बोलले होते, त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा वेळ लागणार होता म्हणून त्यांनी स्वतः हून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक सुरु करा असं सांगितले. असं माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.