‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

  • Written By: Published:
‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहे. जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र आता जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत आज रात्री किंवा उद्या सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषणाबाबात निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच आता वेगळ्या मार्गाने मी आंदोलन करणार आहे. असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आज रात्री किंवा उद्या सकाळी मराठा समाजाशी चर्चा करून उपोषण सोडण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, एक गोष्ट चांगली झाली फडणवीस यांना आम्ही आवाहन केलं होतं की, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा मात्र त्यांनी याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. तसेच आता आमचे डोळे उघडले आहे आणि समाजाचे देखील डोळे उघडले आहे. मराठा द्वेषी कोण आहे? हे आता कळलं आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं होतं. फडणवीस द्वेष आणि सुड भावनेने वागतात हे आता लोकांना कळलं असेल. असं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

तसेच आम्ही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. आपण 4-5 दिवस आंदोलनाकडे लक्ष दिले. मी आता सकाळी समाजाशी या उपोषणाबाबत बोलतो आणि समाजाशी बोलून उपोषणाबाबत निर्णय घेणार. फडणवीस तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा मी उपोषण सोडतो.पण तुम्ही काहीही बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असं वाटलं होतं, पण फडणवीस लक्ष द्यायला तयार नाही. फडणवीस आनंद जास्त दिवस राहणार नाही, आनंदावर विरजण पडेल,मला मनोज जरांगे म्हणतात. असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

वायरलेसचा वापर अन् ‘K’ लिहिलेल्या गाड्या, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेने केली होती खास तयारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube