Santosh Deshmukh : कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसचा धनंजय मुंडेंवर निशाणा

  • Written By: Published:
Santosh Deshmukh : कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसचा धनंजय मुंडेंवर निशाणा

Nana Patole : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंड (Dhananjay Munde) यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात केवळ धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच (Sanjay Rathod) नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जर भारतीय जनता पक्ष (BJP) स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते, तर त्यांनी या सर्व गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली.

ग्राहकांनो, उद्यापासून बदलणार UPI आयडीचे नियम, पेमेंट करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या 

महायुती सरकार गुन्हेगारांचे सरकार…
नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना पटोलेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बीड हत्या प्रकऱणावर बोलतांना ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत. पण सरकार यावर कोणतीही ठाम भूमिका घेतांना दिसत नाही. महाराष्ट्रातील भाजप-युती सरकार हे गुन्हेगारांचे सरकार आहे, त्यांच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावे आणि राज्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा, असं पटोले म्हणाले.

मोठी बातमी! 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोध धोडींचा मृतदेह कारच्या डिक्कीत सापडला, सर्वत्र खळबळ… 

पुढं ते म्हणाले की, राज्यात भाजपा-युतीचे सरकार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. सोयाबीन, धान, कांदा या कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हताश झाला. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. भाजप युती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्यांना वीज बिल पाठवली जात आहे. या सरकारने वीज दर वाढवले ​​आहेत, एसटी तिकिटांचे दर वाढवले ​​आहेत. महाराष्ट्रातील २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, महागाई वाढत आहे पण सरकार याकडे लक्ष देत नाहीये, कॉंग्रेस पक्ष जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारले, असं पटोले म्हणाले.

काही लोक जिकडे सत्ता, तिकडे…
रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चाही आहे. याविषयी विचारले असता पटोले म्हणाले, राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात. सत्ता जिथे असेल त्याबाजूने वागणारे काही लोक असतात. त्यामुळं यावर आज कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही. पण महाराष्ट्रात जनमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या पापांमुळे जनतेच्या मतदानावर दरोडा टाकला गेलाय. सामान्य लोकांना कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार अपेक्षित आहे, त्यामुळं काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार बुहमतात येईल, असं मला वाटतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube