संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहा जणांना न्यायालयीन कोठडी; आरोपींना न्यायालयात का आणले नाही ?
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्याप्रकरणातील सहा आरोपींची कोठडी आज संपली होती. परंतु सुरक्षाच्या कारणास्तव या आरोपींना बीड (Beed) जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजची सुनावणी झाली. त्यात सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासासाठी गरज पडली तर आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळू शकतो, असे सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. पण आरोपींची वकिलांनी असे करता येणार नाही, असे म्हटले आहे. पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला (Walmik Karad) मोक्का लावण्यात आलाय. पण अजूनही त्याचे नाव खुनाच्या गुन्ह्यात घेण्यात आलेले नाही.
शरद पवार गटाचे नेते अजितदादा गटाच्या वाटेवर, तटकरे म्हणाले, ‘पक्ष सत्तेत असल्यामुळे….’
हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सरकारी पक्षाचे वकील यांनी बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली आहे. आरोपींना व्हीसीद्वारे हजर केले. त्यांना संवाद साधण्यासाठी सुविधा देण्यात आले आहे. पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी केलीय. गरज पडली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते.
वाल्मिक कराडचं सोलापुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर जमीन, सातबारा आला समोर…
आता जामिनासाठी अर्ज करणार-अनंत तिडके
आधीच आरोपींना 45 दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना पंधरा दिवसांपेक्षा जास्त पीसीआर देता येणार नाही. ज्यावेळी ते पीसीआर मागतील, तेव्हा आम्ही ते त्यांना पटवून देऊ की पीसीआर देणं योग्य नाही आहे. आरोपींच्या जमीनासाठी अर्ज करणार असल्याचे आरोपींचे वकील अनंत तिडके यांनी सांगितले.
वाल्मिक कराड, विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी ?
खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड व विष्णू चाटेने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यानुसार आता ही सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार आहे.