वाल्मिक कराडचं सोलापुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर जमीन, सातबारा आला समोर…

  • Written By: Published:
वाल्मिक कराडचं सोलापुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर जमीन, सातबारा आला समोर…

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) दहशत करून करोडोंची संपत्ती जमवल्याचा आरोप होतोय. आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या (Jyoti Jadhav) नावे पुण्यापाठोपाठ सोलापुरातही (Solapur) शेतजमीन असल्याची माहिती आता उघडकीस आली.

Champions Trophy 2025 भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी 

सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची पुण्यात १०० कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचा दावा केल्यानंतर, पुण्यात त्याची दोन कार्यालये आणि तीन फ्लॅट्स असल्याचे उघड झालं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. ज्योती मंगल जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी आहे. तिच्या नावे सोलापुरात शेतजमिनी असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल X वर पोस्ट केली होती.

दमानिया यांची पोस्ट
दमानिया यांनी त्यांच्या एक्स-अकाउंटवर पोस्ट करून एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोलापूरमध्ये ज्योती मंगल जाधव नावाच्या महिलेच्या नावावर चार सातबारे आहेत. ही महिला कोण आहे? याचा ईडीने तपास करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली. दमानिया यांनी चारही शेतजमिनीची तपशीलवार माहिती दिली. तसेच जमीन कोणी खरेदी केली, पैसे कोणी दिले आणि कसे दिले? याची चौकशी करावी, असंही दमानिया म्हणाल्या.

Avneet Kaur : अवनीतचं स्टायलिश फोटोशूट, दिलखेचक अदांवर चाहतेफिदा… 

या जमिनीबद्दल अधिक माहिती अशी की, ज्योती जाधवकडे बार्शीमधील शेंद्री गावात ४ शेतजमीन आहे. गट क्रमांक ५०४ मधील उपविभाग १, २, ३ आणि ४ अशा एकूण ४ शेतजमीन जाधव यांच्या मालकीच्या आहेत. या सर्व जमिनींचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३५ एकर इतकं आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्योती जाधवच्या पुण्यातील मालमत्तेची माहिती समोर आली होती. फर्ग्युसन कॉलेजसमोर जाधवच्या मालकीच्या कार्यालयीन वापरासाठीच्या २ जागा आहेत. हडपसरमधील एॅमनोरा टाउनशिपमध्ये तिच्या नावावर दोन सदनिकाही आहेत.

ज्योती जाधवनं पुण्यात जमीन, कार्यालनीय वापराच्या जागा, सदनिका खरेदी करताना काही कागदपत्रे सादर केली. तीच कागदपत्रं तिनें बार्शित शेतजमिनी खरेदी करतांना दिली त्यामुळं दोन्ही ज्योती जाधव एकच असल्याचं स्पष्ट झालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube