मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील CIDचे तपास अधिकारी बदलले, नेमकं कारणं काय?
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली. या प्रकरणातील सीआयडीचे (CID) अधिकारी अनिल गुजर (Anil Gujar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी किरण पाटील (Kiran Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Video: घरात जाताना बिना चप्पल अन् बाहेर येताना बुट घालून; सैफच्या इमारतीतला नवा सीसीटीव्ही समोर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करतील. अनिल गुजर यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रॅंकच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करणारे अनिल गुजर हे पोलिस निरीक्षक रॅंकचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील तपास आचा डीवायएसपी अर्थात उपअधिक्षक रॅंक असलेल्या किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Jui Gadkari : जांभळ्या सिल्क साडीत जुईचा मोहक लूक, चाहत्यांचे वेधले लक्ष…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे, असं अनिल गुजर यांनी सांगितलं होतं. मात्र, यामध्ये वाल्मिकी कराड हा मुख्य आरोपी आहे, असं सांगितलं नाही. त्यामुळं गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये, असंही बोलल्या जात आहे.
एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांचीही उचलबांगडी…
दरम्यान, याआधी एसआयटी टीममधील बऱ्याचं अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. एसआयटी पथकातील अनेकांवर आरोप करण्यात आले होते. जुन्या एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांचे वाल्मिकी कराडसोबत संबंध असल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर, एसआयटीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बीड हत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची नजर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर आणि कोणत्याही त्रुटींशिवाय व्हावा, यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. तसंच या प्रकरणी दोषी असणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली.