शरद पवार गटाचे नेते अजितदादा गटाच्या वाटेवर, तटकरे म्हणाले, ‘पक्ष सत्तेत असल्यामुळे….’

  • Written By: Published:
शरद पवार गटाचे नेते अजितदादा गटाच्या वाटेवर, तटकरे म्हणाले, ‘पक्ष सत्तेत असल्यामुळे….’

Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) पक्षाचा मोठा पराभव झाला, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. आता ऐन महानगरपालिकांच्या निडणुकीच्या (Municipal Corporation Elction) तोंडटावर अनेक नेते, पदाधिकारी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर आता खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare ) यांनी भाष्य केलं. आमचा पक्ष सत्तेत असल्यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली, असं ते म्हणाले.

सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलीस थेट मध्य प्रदेशात, एक संशयित ताब्यात 

राष्ट्रवादीत कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे शिर्डीत चिंतन शिबीर सुरू आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना खासदार सुनील तटकरेंनी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आज दिवसभरात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन भाषणं झालीत.
काही जिल्ह्याध्यक्षांनी आज शिबिरात भूमिका मांडली की, यापुढे आपल्या पक्षात पक्षप्रवेश घेत असताना आम्हाला विचारात घेऊन तो पक्षप्रवेश करावा..खरंतर आपला पक्ष सत्तेत असल्यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, नवीन लोकांचा पक्ष प्रवेश करतांना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील, त्यानंतरच पक्ष प्रवेश होतील, असं तटकरे म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते अजितदादा गटाच्या वाटेवर, तटकरे म्हणाले, ‘पक्ष सत्तेत असल्यामुळे….’ 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर का? असा सवाल केला असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पार पडतील. या स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याची भावना कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. त्यांनी या शिबिरात त्यांच्या भूमिका मांडल्या. मात्र या निवडणुकींचा कार्यक्रम जारी झाल्यावर महायुतीच्या तीनही घटक पक्षाचे प्रमुख निवडणूक कशा लढवायच्या? याबाबत निर्णय घेतील, असं तटकरे म्हणाले. पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी राज्यभरात एका ठराविक कालावधीत सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.

छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहे. पक्षासाठी त्याचं मोठं योगदान आहे. अनेकांना वाटलं की, ते अधिवेशनाला आले येणार नाहीत. पण भुबजळ साहेब अधिवेशनाला आले. यातून त्यांची पक्षाविषयाची बांधिलकी दिसून येते. आज भुजबळांचं भाषण होणार आहे, पण ते उद्या शिबिराला उपस्थित राहणार नाही आहेत, असं तटकरे म्हणाले. आज संध्याकाळी धनंजय मुंडे शिबिराला पोहोचतील, असंही त्यांनी सांगितल.

जानकरांची भूमिका दुटप्पी
ईव्हीएच्या मुद्द्यावरून उत्तमराव जानकर सातत्याने महायुतीवर टीका करत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुक घेत असाल तर मी माझ्या आमदारीचा राजीनामा द्यायलाही तयार आहे, असं ते म्हणाले. यावर तटकरेंना विचारलं असता ते म्हणाले, जानकरांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा हा त्यांचा निर्णय आहे. पण, जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा कळेल ते निवडून येतील की नाही? खरंतर लोकसभेला मिळालेलं यश त्यांचा कर्तुत्वचा भाग आणि विधानसभेत मिळालेलं अपयश EVMमुळे, अशी दुटप्पी भूमिका जानकर घेत आहेत, अशी टीका तटकरेंनी केली.

एक खिडकी योजना लागू होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा केली. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार आहे. तसेच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार, अशी घोषणा त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube