राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांची तयारी; गणेशोत्सवानंतर कार्यकर्ते अहवाल देणार

  • Written By: Published:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांची तयारी; गणेशोत्सवानंतर कार्यकर्ते अहवाल देणार

NCP SharadChandra Pawar Party :  राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांवर तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक स्तरावर आपली तयारी असावी म्हणून 100 च्या जवळपास (Sharad Pawar) विधानसभेची तयारी सुरु केल्याच समोर आलं आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, बूथ कमिट्या तयार करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गणेश उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचंही समोर आलं आहे.

“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम., शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

बूथ कमिटी

शरद पवार गटाची प्राथमिक स्तरावर तयारी असावी, म्हणून १०० च्या जवळपास तयारी सुरु आहे. गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा. बूथ कमिटी तयार करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचं समोर आलंय.

जबरदस्त! या सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई

महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा

यंदा विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेस देखील जास्त जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट देखील अधिकच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर शरद पवार गटाने १०० जागांसाठी तयारी सुरू केलीय. परंतु अद्याप महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube