जबरदस्त! ‘या’ सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई

  • Written By: Published:
जबरदस्त! ‘या’ सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई

Post Office Monthly Income Scheme : तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी एखादी सरकारी योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस (Post Office) एक जबरदस्त योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही एकदा गुंतवणूक करून दरमहा पैसे कमवू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला या जबरदस्त आणि लोकप्रिय पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मासिक (Post Office Monthly Income Scheme) उत्पन्न योजना आहे. या योजनेत एकदाच गुंतवणूक करायची असते. या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता आणि जर तुम्ही पती-पत्नी संयुक्त खाते उघडले तर तुम्ही 15 लाख रुपये जमा करू शकता. यानंतर तुम्हाला दरमहा व्याज मिळतो. सध्या या योजनेत गुंतवणूकदारांना 7.4 टक्के व्याज दिले जात आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी कालावधी 5 वर्षे आहे. तुम्ही पाच वर्षासाठी या योजनेत पैसे गुंतवू शकतात. त्यानंतर तुमच्या खात्यात 5 वर्षे दर महिन्याला व्याज जमा होत राहील.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी योजना असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे मात्र तुम्ही तुमचे पैसे मुदतपूर्तीपूर्वीही काढू शकता. तसेच या योजनेत तुम्ही तुमचे पैसे आणखी पाच वर्षांसाठी देखील गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला 1000 च्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करते येत आणि सध्या या योजनेत 7.4 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे.

वेळेपूर्वी पैसे काढू शकता

या योजनेचा कालावधी पाच वर्ष आहे मात्र तुम्ही 5 वर्षापूर्वीही पैसे काढू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षाने तुम्हाला या योजनेतून पैसे काढता येतात. मात्र जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल.

मुदतपूर्व खाते बंद केल्याने नुकसान

खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही पैसे काढू शकत नाही. तसेच खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी तुम्ही खाते बंद केल्यास तुमच्या मूळ रकमेतून दोन टक्के वजा केले जाते. याच बरोबर खाते उघडण्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास तुमच्या मूळ रकमेतून 1 टक्के वजा केला जाईल आणि मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाऊ शकते आणि रक्कम नॉमिनीला व्यक्तीला परत केली जाईल.

अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकरण, 71 वर्षाच्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या

गुंतवणूक कशी करावी

या योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला खाते उघडण्यासाठी ओळखपत्र, घराच्या पत्त्याचा पुरावा आणि दोन फोटो आवश्यक आहेत. पैसे रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे जमा केले जाऊ शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या