अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकरण, 71 वर्षाच्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून पुणे (Pune) , मुंबई आणि नाशिक सारख्या शहरात कोयता गॅंगची दहशत पसरत आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता अहमदनगर शहरातून (Ahmednagar) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
माहितीनुसार, शहरातील सारसनगर (Sarasnagar) भागात एका जेष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. भानुदास मिसाळ (वय 71 वर्ष) (Bhanudas Missal) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक घोलप (Ashok Gholap) याला पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, सारसनगर भागातील राजश्री कॉलनी, कपिलेश्वर नगर येथे सकाळी साडेसात वाजता आरोपी अशोक घोलप याने दहशत माजवत ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ या 71 वर्षीय वृद्धाची धारदार चाकूने वार करीत हत्या केली. तर त्यांचे व्याही लहू सानप यांना जखमी केले असून आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंद धाम येथे जेरबंद केले आहे.
घटनास्थळी आमदार संग्राम जगताप,शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भरती यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. माहितीनुसार, आरोपी अशोक घोलप हे गेल्या वीस वर्षांपासून कॉलनीमध्ये दहशत माजवत होता. रविवारी सकाळी एका ज्येष्ठ वृद्ध महिलेला दांडक्याने मारहाण केली घरामध्ये कोयते, तलवारी, कुऱ्हाड आधी धारदार शस्त्र आढळली असून पोलिसांनी ते शस्त्र हस्तगत केली असून या प्रकरणात पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे.
अजितदादा खरंच निवडणूक लढणार नाहीत? बारामतीत येऊन नेमकं काय म्हणाले..
पुण्यात कोयता गॅंगची दहशत
तर दुसरीकडे 04 सप्टेंबर रोजी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. सागर चव्हाण (Sagar Chavan) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला करण्यात आला अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.