..हा महाराष्ट्रातील जातीयवादाचा नवा अंक; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा घणाघाती वार
Manoj Jarange Patil on Namdev Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर नामदेव शास्त्री बोलले. धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. धनंजय मुंडे यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. (Namdev Shastri ) त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठं वादंग उठलं आहे. त्यावर आता मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जरागे पाटील?
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यनंतर महाराष्ट्राला जातीयवादाचा एक नवा अंक पाहायला मिळाला. कारण, आजपर्यंत आम्ही आमचा हक्क मागितला तरी आम्ही जातीयवादी ठरत आहोत. मग, अशा मोठ वलय असणाऱ्या, मोठी गडाची परंपरा असताना, साधूसंतांचा मार्ग सांगत असताना आणि ज्यांना सर्व जाती समूहाची मान्यता असताना महंतांनी अशी कुणाची बाजू कशी घ्यावी असा थेट प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होणार; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून आव्हाडांचा वार
आज महाराष्ट्रात हा एक नवा अंक तयार करण्यात आला आहे. मात्र, मला महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जास्त दोष देऊ वाटत नाही. कारण, धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने त्यांना हे सर्व करायला लावलं आहे असं माझं मत आहे. कारण, त्यांना दोष देण्यापेक्षा यांच्यामुळे कुणाकुणाला काय काय बोलाव लागत आहे हे आपण पाहत आहात. आज राज्यात अनेक लोक अशी बाजू घेताना किंवा काही बोलत असताना आपण पाहत आहोत असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांची भेट घेण्यासाठी स्व. संतोष देशमुख यांचं कुटुंब जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले तो आता त्यांचा कुटुंब म्हणून एक भाग आहे. त्यावर आपण काय बोलावं. तसंच, सगळं जे काही बोलायचं ते बालून गेले आहेत. त्यावर आता काय भेटाव? आणि त्यावर काय बोलाव असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.