‘माझ्या वडिलांना न्याय द्या…’ वैभवी ढसाढसा रडली, थेट बारामतीकरांच्या काळजाला हात घातला

Vaibhavi Deshmukh In Santosh Deshmukh Justice Morcha Baramati : बारामतीमध्ये आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिला अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय. आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Baramati) संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी झाले होते.
बारामतीकरांसोबत बोलताना वैभवीला अश्रू अनावर झाले होते. यावेळी वैभवी म्हणाली की, माझ्या वडिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागतोय. सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सीआयडी योग्य दिशेने तपास (Maharashtra Politics) करतेय. राहिलेल्या एका आरोपीला सुद्धा लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी वैभवीने केलीय. यावेळी वैभवीच्या अश्रूंचा बांध फुटला होता, त्याने बारामतीकरांना गहिवरून आलंय.
‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?
यावेळी वैभवी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हणाली की, अजितदादा तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय. त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमचं जगणं देखील मुश्किल झालंय. माझ्या वडिलांचा खंडणीसाठी जीव गेलाय, ती खंडणी कोणासाठी मागितली जात होती? त्यांचा काय गुन्हा होता, असे प्रश्न देखील वैभवी देशमुखने भरसभेत विचारले आहेत.
माझे वडिल गेलेत. आम्ही न्याय मागतोय, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी वैभवीने अजित पवार यांच्याकडे केलीय. ती म्हटली की, या प्रकरणाची सखोल चौकशी करा. याआधी सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. अजितदादा ‘खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोट’ करणारं व्यक्तिमत्व आहे, असं देखील वैभवी म्हटली आहे.
‘रस्त्यांखाली… हजार वर्षांपूर्वीचं काहीतरी सापडेल’, शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप
एकदा आमच्या घरामध्ये मुंग्या झाल्या होत्या. तेव्हा माझ्या वडिलांनी आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकून दिली नाही. त्यांनी चिकटपट्टी लावली आणि त्या मुंग्या खाली येण्यापासून थांबवल्या. माझे वडिल एवढ्या संवेदनशील मनाचे होते, असं सांगतांना वैभवी ढसाढसा रडली. तिला भावना अनावर झाल्या होत्या.