Vietnam Fire : व्हिएतनाममध्ये अग्नितांडव! 50 जणांचा होरपळून मृत्यू

Vietnam Fire : व्हिएतनाम देशाची राजधानी हनोईमध्ये बुधवारी मध्यरात्री एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग (Vietnam Fire) लागली. या आगीत तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता एका नऊ मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत 150 लोक वास्तव्यास होते. या घटनेत मात्र 50 लोकांचा मृत्यू झाला. याबाबत आधिक माहिती […]

Vietnam Fire

Vietnam Fire

Vietnam Fire : व्हिएतनाम देशाची राजधानी हनोईमध्ये बुधवारी मध्यरात्री एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग (Vietnam Fire) लागली. या आगीत तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता एका नऊ मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत 150 लोक वास्तव्यास होते. या घटनेत मात्र 50 लोकांचा मृत्यू झाला.

याबाबत आधिक माहिती अशी, शहरातील ज्या इमारतीला आग लागली (Vietnam Fire) ती इमारत नागरी वस्तीत अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आहे. या घटनेत आतापर्यंत 70 लोकांना वाचविण्यात यश मिळाले आहे. यातील काही जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत लहान मुलांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इमारतीच्या लहान बाल्कनीला लोखंडी जाळीने बंदीस्त करण्यात आले होते. तसेच अपार्टमेंटमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. इमारतीला इमर्जन्सी दरवाजा देखील नव्हता. अशा परिस्थितीत लोकांची मोठी घुसमट झाली. तरीदेखील शर्थीचे प्रयत्न करण्यात येऊन यातील 70 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले.

पाकिस्तानात राजकीय हालचालींना वेग; माजी पंतप्रधान नवाज शरीफ ‘या’ तारखेला परतणार

व्हिएतनाममध्ये याआधी मागील वर्षात हो ची मिन्ह सिटीतील एका तीन मजली बारला आग लागली होती. आताच्या आगीच्या घटनेने या जुन्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. या आगीतही जवळपास 32 लोकांचा मृत्यू झाला होता. या आगीपेक्षा आज मध्यरात्री इमारतीला लागलेल्या आगीत जास्त जीवितहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. तत्काळ आगीवर नियंत्रणाचे काम सुरू करण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेनंतर इमारतींमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version