पाकिस्तानात राजकीय हालचालींना वेग; माजी पंतप्रधान नवाज शरीफ ‘या’ तारखेला परतणार

पाकिस्तानात राजकीय हालचालींना वेग; माजी पंतप्रधान नवाज शरीफ ‘या’ तारखेला परतणार

Nawaz Sharif : पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) सुप्रीमो नवाझ शरीफ आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या राजकीय प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी लंडनहून पाकिस्तानला परतणार आहेत. त्यांचे धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 73 वर्षीय नवाज नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये स्व-निर्वासित जीवन जगत आहेत.

लंडनमध्ये नवाझ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमएल-एनच्या बैठकीनंतर शाहबाज म्हणाले, ‘नवाज शरीफ 21 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला परततील. त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.’

नवाज शरीफ यांना 2018 मध्ये अल-अझिझिया मिल्स आणि एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. 2019 मध्ये “वैद्यकीय कारणास्तव” लंडनला जाण्याची परवानगी देण्यापूर्वी ते अल-अझिझिया मिल्स प्रकरणात लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते.

Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल…

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांना कायद्यानुसार वागणूक दिली जाईल का? या प्रश्नावर कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर म्हणाले की, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका सुरू करण्याचा आपला मानस नाही.

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकांबाबत अटकळ बांधली जात आहे. जिओ न्यूजनुसार, पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्रपतींना निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. निवडणुकीबाबत निर्णय फक्त पाकिस्तान निवडणूक आयोग (ECP) घेईल.

Libya Flood : लिबियात पावसाचा हाहाकार ! धरणे फुटली, इमारती वाहिल्या; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

एका खाजगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कक्कर म्हणाले की, संसदेने एक कायदा मंजूर केला आहे, ज्यानुसार नवीन निवडणुकांची तारीख जाहीर करण्याचा अधिकार ECP ला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी निवडणुकीच्या तारखेची घोषणा करतील अशी अपेक्षा असताना अन्वर-उल-हक काकर यांचे वक्तव्य आले आहे.

कार्यवाहक पंतप्रधानांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कार्यवाहक कायदामंत्र्यांशी चर्चा केली. अन्वर-उल-हक कक्कर म्हणाले की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर निवडणुकीत भाग घेण्यास बंदी नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube