Libya Flood : लिबियात पावसाचा हाहाकार ! धरणे फुटली, इमारती वाहिल्या; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

  • Written By: Published:
Libya Flood : लिबियात पावसाचा हाहाकार ! धरणे फुटली, इमारती वाहिल्या; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

Libya Flood : भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार माजविला आहे. वादळामुळे झालेल्या पावसामुळे लिबियामधील दोन धरणे फुटली आहेत. या धरणांचे पाणी एका शहरात घुसल्याने इमारती कोसळल्या आहेत. त्यात या शहरात दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा हजारांहून अधिक नागरिक हे वाहून गेले आहेत. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती लिबियातील प्रशासनाने दिली आहे. लिबियातील शहर डर्नाला सर्वाधिक फटका बसला आहे. या शहरातील एक हजारांहून अधिक जणांचे मृतदेह सापडले आहेत.


अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले

पावसामुळे डर्ना शहरात विनाश झाला आहे. येथील मृतदेह हे समुद्रात वाहून गेले आहेत. तर काही मृतदेहांचे खच इमारतींमधून पडून आहेत. डर्ना शहरात एक हजारांहून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. तर मृतदेहांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शहरातील 25 टक्कांपेक्षा जास्त भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. या भागात सोमवारी दोन हजारहून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. तर अजूनही हजारो लोक बेपत्ता असल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री आणि आपात्कालीन समितीचे सदस्य हिचेम चकियोआट यांनी वृत्तसंस्थांना दिली आहे.


पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार

डर्ना शहरातील वरच्या भागातील दोन धरणे फुटल्याने या शहरात पाणी घुसले आहे. त्यानंतर या शहरातील इमारती कोसळल्या असल्याचे व्हिडिओ, फोटोज ही समोर आले आहे. या शहरातील रस्त्यांवर मृतदेह दिसून येत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.


संघर्षानंतर लिबियाची वाईट अवस्था

लिबिया या देशातील राजकीय संघर्ष आहे. पूर्व व पश्चिम दोन भागात हा देश वाटला गेलेला आहे. 2011 मध्ये झालेल्या विद्रोहानंतर येथील सार्वजनिक सेवा संपलेल्या आहेत. तर या देशात संघर्ष सुरू आहे. त्रिपोलीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर लिबिया सरकार पूर्व भागात नियंत्रण ठेवू शकत नाही.


समुद्री किनारपट्टीला फटका

मागील आठवड्यात ग्रीस देशात डॅनिअल वादळाचा फटका बसला होता. त्यानंतर या वादळाने भूमध्य समुद्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे दोन्ही धरणे फुटली आहे. या धरणांचे पाणी डर्ना शहरात घुसले आहे. हे शहर हे डोंगरात वसलेले आहे. या शहरात पाणी भरलेले आहे. तर इमारतीही कोसळल्या आहेत. तर दुसरे सर्वात मोठे शहर बेंगाजीसहित समुद्रा किनारासह इतर भागांना पुराचा फटका बसला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube