पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार

  • Written By: Published:
पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार

मुंबई : थोडं थांबा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी केले. लष्कर प्रमुख असताना हे प्रयत्न व्हायला हवे होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी लष्कर प्रमुख व्हि के सिंह यांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच माजी लष्कर प्रमुखांनी असं बेजबाबदार वक्तव्य करू नये असा सल्लादेखील दिला आहे.

Maratha Reservation चा हिरो झळकणार पडद्यावर; जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लाँच…

मणिपूर, लडाख आणि अरूणाचल प्रदेशचाही उल्लेख

यावेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राऊतांनी मणिपूर हिंसाचार, लडाख आणि अरुणाचल प्रदेशचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, चीनने लडाखमध्ये प्रवेश केला आहे आणि अरुणाचल प्रदेश आपला भाग असल्याचा दावा करणारा नकाशा जारी केला आहे. चीनच्या या भूमिकेवर सर्वप्रथम योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.

‘आम्ही अखंड भारत होण्याचे स्वप्न पाहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत आम्ही नेहमीच तो आमचा भाग असल्याचे सांगतो. पण माजी लष्करप्रमुख त्यांच्या पदावर असताना पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.

Diesel Vehicles महागणार! 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची गडकरींची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

तुम्ही हा भाग भारतात सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर, आम्ही तुमचे स्वागत करू, पण त्याआधी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. मणिपूरपर्यंत चीन घुसला आहे. अरुणाचलचा काही भाग चीनच्या नकाशावर दाखवण्यात आला आहे. आधी ही क्षेत्रे भारताच्या नियंत्रणाखाली घ्या असे राऊतांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते व्ही के सिंह 

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह यांनी केले आहे. राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील विधान केले आहे.

फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना व्हीके सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल असे उत्तर दिले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पदावर असताना याबाबत प्रयत्न करायला हवे होते असे म्हणत हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube