फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

  • Written By: Published:
फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

जालना : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवासांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले असून, आतापर्यंत राज्य शासनाने दिलेले सर्व प्रस्ताव धुडकावून लावले आहेत. काल (दि. 11) संध्याकाळी या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकदेखील पार पडली. त्यानंतर आज (दि.12) जरांगे त्यांचा पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच उपोषणस्थळी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) दाखल होत जरांगे पाटलांना बळ दिले आहे. त्यामुळे आता जरांगे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भिडेंनी जरांगेंना उपोषण थांबवण्याचे आवाहन केल्याचेही सांगितले. तसेच लढा थांबवू नका उपोषण थांबवा असे सांगत पुढील जबाबदारी माझ्यावर टाकावी असेदेखील भिडे गुरूजींनी जरांगे पाटलांना सांगितले आहे. ( Jalna Maratha Andolan Update)

Maratha Reservation : संभाजी भिडे मनोज जरांगेंना भेटताच मुख्यमंत्र्यांची कोंडी !

काय म्हणाले भिडे गुरूजी

जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर भिडे गुरूजी म्हणाले की, जरांगेंच्या लढ्याला 100 टक्के यश मिळेल असे म्हणत त्यांचे उपोषण योग्य आणि सुत्य असल्याचे भिडे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाही, असे म्हणत शिंदे आणि फडणवीस लबाडी करणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारमधील तिनही नेते म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार धुरंधर असून हवे ते मिळवून देण्याची जबाबदारी आपल्याला द्यावी असे भिंडेंनी जरांगेंना सांगितले आहे.

Maratha Reservation : गावकऱ्यांचा आग्रह मोडला नाही, मनोज जरांगेंनी घेतले सलाईन

अजित पवार काळजी करणारा माणूस 

जरांगेंच्या भेटीदरम्यान भिडेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी, ते काळजी करणारे असल्याचे माझे मत आहे. त्यामुळे तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल असेा विश्वास व्यक्त करत उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. मागच्या अनेक दिवसात एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यात नव्हतं. ते आता आलेलं आहे. ही माणसं शब्द पाळतील, यावर माझा विश्वास आहे.

सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पाडली. जालन्यात मराठा आंदोलनात घडलेल्या लाठीचार्ज प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आंदोलनात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतच्या सूचना राज्य सरकारकडून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube