Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल…
Kerala : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आल्याचं मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना विषाणुचाही पहिला रुग्ण केरळमध्येच आढळून आला होता. त्यानंतरच संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरले होते. निपाह विषाणूमुळे 30 ऑगस्ट रोजी पहिला मृत्यू झाला होता, त्यानंतर आता 11 सप्टेंबर रोजी दुसऱ्या रुग्णाची मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा
राज्य सरकारकडून अद्याप घोषणा नाही :
केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सरकार गंभीर असून कोझिकोड परिसरात आरोग्य विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्या दोन रुग्णांचा मृत्यू झालायं, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, मात्र, अद्याप केरळमध्ये निपाहचा प्रादुर्भाव झाल्याचं घोषित करण्यात आलेलं नाही.
जानकरांचा भाजपला दणका! जागांची मागणी करत ‘इंडिया’त जाण्याचे दिले संकेत
केरळमध्ये याआधीही निपाह व्हायरसमुळे नागरिकांचा बळी गेल्याचं समोर आलं होतं. 2018 साली 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर 2021 मध्ये कोझिकोडमध्ये एक रुग्ण आढळला होता, आता पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे.
शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? वडेट्टीवारांचा धनंजय मुंडेंना खोचक सवाल
निपाह व्हायरची लक्षणे कोणती?
निपाह व्हायरस केवळ प्राण्यांद्वारेच नाही तर हा संसर्गजन्य आजार असून एका रुग्णापासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच निपाहची लागण झाल्यानंतर रुग्णाला ताप, डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणं अशी लक्षणे दिसून येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून दावा करण्यात आला आहे.