Download App

अन्न नाही, पाणी नाही…., तुर्की विमानतळावर 30 तास अडकले भारतीय; व्हिडिओ व्हायरल

Virgin Atlantic Flight : तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर (Diyarbakir Airport) लंडनहून मुंबईला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानातील

  • Written By: Last Updated:

Virgin Atlantic Flight : तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर (Diyarbakir Airport) लंडनहून मुंबईला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानातील (Virgin Atlantic Flight) 260 हून अधिक प्रवासी 30 तासांहून जास्त काळापासून अडकले असून प्रवासी आता मदतीची मागणी करत आहे. तर दूसरीकडे व्हर्जिन अटलांटिक एअरलाइनने हार्ड लाँडिंग असं या घटनेचा वर्णन केला आहे. माहितीनुसार काही तांत्रिक समस्येमुळे विमान उडू शकत नाही असं व्हर्जिन अटलांटिक एअरलाइनकडून माहिती देण्यात आली होती त्यानंतर विमानातील क्रूला एका हाॅटेलमध्ये नेण्यात आले तर प्रवाशींना एका प्रतिबंधित क्षेत्रात ठेवण्यात आले जिथे पुरेशा सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या.

एअरलाइनचे निवेदन

या प्रकरणात एअरलाइन निवेदनात माहिती दिली आहे की, भारतीय दुतावसाच्या मदतीने काही प्रवाशांना जवळच्या हाॅटेलमध्ये नेण्यात आले असून स्थानिक वेळेनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत बॅकअप फ्लाइट तयार होईल. अशी माहिती एअरलाइनकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी अजूनही विमानतळ ट्रान्झिट होल्डिंग क्षेत्रात अडकले आहे.

भारतीय दूतावासाचे निवेदन

या प्रकरणात तुर्कीमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावास व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स, दियारबाकिर विमानतळ संचालनालय आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्कात आहे. प्रवाशांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून लवकरात लवकर ही समस्या सोडवता येईल आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी मुंबईला पर्यायी विमानाची व्यवस्था करता येईल असं एका निवेदनात तुर्कीमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे.

प्रवाशांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या

तर दुसरीकडे अडकलेल्या प्रवाशांनी आरोप केला की विमान कंपनी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात अपयशी ठरली. प्रवाशांनी आरोप केला की व्हर्जिन एअरलाइन्सने प्रवाशांसाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा त्यांना मुंबईला कधी जाता येईल याची कोणतीही माहिती दिली नाही.

ईडीने नऊ महिने आत ठेवलेल्यांनी बोलताना भान ठेवावे; राष्ट्रवादीचा प्रवक्ता राऊतांवर बरसला

विमानात अडकलेल्या प्रवाशांनी ट्विटरवर अपुरे अन्न, शौचालये आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्स यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली.

follow us