पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव! फक्त 61 चेंडूत न्यूझीलंडने सामना जिंकला; फलंदाजांची कमाल

New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडने पाकिस्तानला पहिल्या टी 20 सामन्यात जोरदार दणका (New Zealand vs Pakistan) दिला. न्यूझीलंडने 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला फक्त 91 धावा करता आल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धुवाधार फंलदाजी करत अवघ्या 10.1 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. न्यूझीलंडकडून टिम सफर्टने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 44 धावा केल्या.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 92 धावांचे टार्गेट दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फक्त 61 चेंडूत सामना जिंकला. टिम सफर्ट आणि फिन एलन सलामीला होते. सिफर्टने तुफानी फलंदाजी करत 44 धावा केल्या. सात चौकार आणि 1 षटकार खेचत त्याने न्यूझीलंडच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
पाकिस्तानी खेळाडू नको, द हंड्रेड लीग ड्राफ्टमध्ये 50 खेळाडूंना खरेदीदार नाही
फिन एलनने 29 धावा करत सफर्टला साथ दिली. यानंतर आलेल्या टिम रॉबिनसनने 18 धावा केल्या. अशा प्रकारे न्यूझीलंडने अगदी सहज सामना खिशात टाकला. पाकिस्तानचा अख्खा संघ 18.4 ओव्हर्समध्ये 91 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून खुशदिल शाहने 32 धावा केल्या. कर्णधार सलमान आगाने 18 धावा केल्या. सलामीचे दोन्ही फलंदाज तर शून्यावरच बाद झाले होते. नंतर आलेल्या इरफान खानने फक्त 1 रन केला.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 18 मार्च रोजी डुनेडीन येथे खेळला जाणार आहे. यानंतर तिसरा सामना ऑकलंड येथे होईल. चौथा सामना 23 मार्च रोजी तर पाचवा आणि शेवटचा सामना 26 मार्च रोजी होणार आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पाकिस्तानी संघाला सेमी फायनल राउंडमध्ये देखील एन्ट्री मिळवता आली नाही. साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. दुसरीकडे न्यूझीलंडने थेट फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र फायनल सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, कर्णधारासह ‘हे’ 8 खेळाडू बाहेर