Wake up before AI goes out of control : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात सुरू असलेल्या वेगवान स्पर्धेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओपन एआय आणि अँथ्रोपिक या जगातील आघाडीच्या एआय कंपन्यांमध्ये काम केल्याचा दावा करणारे संशोधक जेकब कॉक्स यांनी नोकरी सोडताना दोन्ही कंपन्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आपण ओपन एआय आणि अँथ्रोपिक या दोन्ही कंपन्यांमध्ये एआय मॉडेल्सच्या प्री-ट्रेनिंग संशोधनावर काम केल्याचे कॉक्स यांनी म्हटले आहे. मात्र, या काळात एआय ज्या दिशेने आणि ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉक्स यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या जबाबदारीने वागत नसून त्या थेट स्वतःमध्ये सुधारणा करू शकणाऱ्या अतिशय शक्तिशाली सुपरइंटेलिजन्सच्या दिशेने धावत आहेत. या स्पर्धेत मानवी जीवन आणि भवितव्य धोक्यात घातले जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
या वक्तव्यानंतर टेक जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण ओपन एआय आणि अँथ्रोपिक या कंपन्या अत्याधुनिक एआय मॉडेल्स विकसित करण्याच्या जागतिक स्पर्धेत आघाडीवर आहेत. विशेषतः अँथ्रोपिक ही एआय सुरक्षेला आणि जबाबदार विकासाला महत्व देणारी कंपनी म्हणून स्वतःची भूमिका मांडत आली आहे. त्यामुळे तिथं काम केलेल्या संशोधकाकडूनच अशा प्रकारची टीका होणे आश्चर्याचे मानले जात आहे.
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते
ब्लूमबर्गच्या चर्चेतही याच मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले. एआय मॉडेल्सची क्षमता अत्यंत वेगाने वाढत असून भविष्यात अशी प्रणाली तयार होऊ शकते का, जी स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यास सुरूवात करेल, सध्या संशोधकांमधील महत्वाचा प्रश्न आहे. याचबरोबर एआय कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धा देखील तीव्र होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वात आधी विकसित करण्याची चढाओढ, त्यातून मिळणार आर्थिक फायदा आणि भविष्यतील बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्याची उच्च यामुळे एआय विकासाचा वेग आणखी वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कॉक्स यांच्या टीकेचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारची भूमिका. एआय तंत्रज्ञान प्रचंड वेगाने पुढे जात असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याचा विकास सुरक्षित पद्धतीने व्हावा यासाठी सरकारकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याची त्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त करणारे कॉक्स हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी देखील एआय क्षेत्रातील संशोधक, कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यंत शक्तिशाली एआय विकसित करताना अधिक कठोर सुरक्षा व्यवस्था आणि प्रभावी नियमनाचिया आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
Apple Watch Series : नवीन हेल्थ अपडेटसह ॲपल स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
या संपूर्ण चर्चेला अमेरिका आणि चीनमधील एआय स्पर्धेची देखील पार्श्वभूमी आहे. अत्याधुनिक एआय किंवा भविष्यातील एजीआय आणि सुपरिंटेलिजन्स विकसित करण्यात चीनने आघाडी घेऊ नये, अशी अमेरिकेत भूमिका अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे अमेरिकन एआय कंपन्यांवर तंत्रज्ञानाच्या शर्यतीत पुढे राहण्याचा दबाव देखिल वाढत आहे. अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांसमोर त्यामुळे एक मोठा विरोधाभास असल्याचे चर्चेतून समोर येते. एका बाजूलासुरक्षित आणि जबाबदार एआय विकसित करण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला जागतिक स्पर्धेत सर्वात पुढे देखील राहायचं.
प्रश्न मात्र आता अधिक गंभीर होत चालला आहे. एआय विकसित करण्याचा या जागतिक शर्यतीत वेग सुरक्षिततेपेक्षा मोठा झाला आहे का? स्वतःमध्ये सुधारणा करू शकणारी अतिशय शक्तिशाली एआय प्रणाली प्रत्यक्षात विकसित झाली, तर तिच्यावर मानवी नियंत्रण कितपत राहील? आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी स्पष्ट आंतरराष्ट्रीय नियम ठरवण्याची वेळ आता आली आहे का?
जेकब कॉक्स यांच्या आरोपांमुळे हे प्रश्न पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. एआयमुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडण्याची क्षमता आहे. मात्र त्याचवेळी या तंत्रज्ञानाचा वेग, त्यावरील नियंत्रण आणि सुरक्षितता सुरक्षितता याबाबत सुरू असलेली चर्चा आता केवळ टेक कंपन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती सरकार, उद्योगविश्व आणि संपूर्ण समाजासाठी महत्वाचा मुद्दा बनत चालली आहे.
