Download App

सुनीता विलियम्स यांचे पती कोण? दोघांची लव स्टोरी अन् विवाहबंधन; किस्साही खास..

भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळ यात्री सुनीता विलियम्स अखेर 286 दिवसांनंतर (Sunita Williams) पृथ्वीवर परतल्या आहेत.

Sunita Williams Husband : भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळ यात्री सुनीता विलियम्स अखेर 286 दिवसांनंतर (Sunita Williams) पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्यासह बूच विलमोर, निक हेग आणि रुसी कॉस्मोनॉट अलेक्झेंडर गोर्बूनोव सुद्धा परतले आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.27 वाजता अमेरिकेतली फ्लोरिडाच्या समुद्रात स्पेसक्राफ्ट उतरले. यानंतर आता जगभरात सुनीता विलियम्स यांची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याच नावाची चर्चा आहे. सुनीता विलियम्स कोण आहेत, त्यांच्या खासगी जीवनाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊ की सुनीता विलियम्स यांचे पती कोण आहेत..

सुनीता यांचे पती मायकल जे. विलियम्स अमेरिकेत फेडरल मार्शल आहेत. अमेरिकी संघीय कायदे लागू करणे आणि न्यायपालिकेचा सुरक्षितता अबाधित राखण्याचे काम त्यांचे आहे. मायकल विलियम्स यांचे कामकाज अतिशय व्यस्त आहे. त्यांना जगभरात अनेक देशांचा प्रवास करावा लागतो. परंतु, मायकल यांच्याकडून नेहमीच सुनीता विलियम्स यांना पाठिंबा दिला जातो. मागील वीस वर्षांपासून ते सुनीता यांच्या सोबत आहेत. मायकल विलियम्स नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात.

सुनीता विल्यम्स अवकाशातून पाहत होती महाकुंभ, लवकर येणार भारतात, कुटुंबाने दिली महत्वाची माहिती

दोघांची ओळख कशी झाली होती

सुनीता आणि मायकल यांची पहिली भेट सन 1987 मध्ये एनापोलिस स्थित नौसेनेच्या अकादमीत झाली होती. त्यावेळेस दोघेही आपापल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. सुनीता नासात येण्याआधी हेलिकॉप्टर पायलट होत्या. मायकल सुद्धा एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट राहिले आहेत. याच कारणामुळे दोघांत मैत्री झाली आणि नंतर हीच मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली.

लग्नापर्यंतचा प्रवास कसा होता

सुनीता आणि मायकल यांनी दीर्घकाळ एकमेकांना समजून घेतलं. यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नात परिवार आणि जवळचे सहकारी हजर होते. मायकलच्या हेलिकॉप्टर पायलटचा अनुभव त्यांच्या कामी आला. जोखीम पत्करणं आणि शिस्तीचं महत्व काय असतं हे यातून त्यांना शिकायला मिळालं. या दोन्ही गोष्टी त्यांची पत्नी सुनीता यांच्या साहसिक अंतरीक्ष करियरशी जुळतात. आज मायकल सुनीता यांच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेला भक्कम पाठबळ देतात.

डिप्रेशन, कर्करोगाचा धोका.., पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना ‘या’ आरोग्य समस्यांना द्यावे लागणार तोंड

follow us