Download App

पुतिन यांच्या खास व्यक्तीनेच उपसलं बंडाचं हत्यार; जाणून घ्या, कोण आहे येवगेनी प्रीगोझिन

  • Written By: Last Updated:

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास दीड वर्षाहून अधिकचा काळ लोटला असून, दोन्ही देशातील युद्धाला पूर्णविराम मिळण्यास यश आलेले नाही. या सर्वामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पुतीन यांची सत्ता उलथून टाकण्याची शपथदेखील घेतली आहे. कमांडरच्या या भूमिकेमुळे मॉस्कोमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येवगेनी प्रिगोझिन हा कधीकाळी पुतीन यांच्या अगदी जवळचा होता. मात्र, आता त्यानेच बंड केल्याने रशियाची काळजी वाढली आहे. (Who Is Yevgeny prigozhin )

व्यापाऱ्यांनी अडचण सांगताच राम शिंदेंची हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह; सभेतूनच थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन

प्रिगोझिन यांनी म्हटले आहे की, त्यांचे 25,000 सैनिक रशियन लष्करी नेतृत्वाला उलथून टाकण्यासाठी पुढे मार्गक्रमण करत असून, या सैन्याची ताकद लक्षात घेता पुतीन यांच्या सुरक्षेसाठी क्रेमलिनमध्ये रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.आमच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट आम्ही नष्ट करू असेही या कमांडरने म्हटले आहे. तसेच रशियन सैन्याचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा प्रीगोझिनने केला आहे.

Breaking News : जयंत पाटील पुन्हा अडचणीत येणार? राजारामबापू सहकारी बॅंकेवर ईडीचा छापा

पुतिन यांच्या खूप जवळ
असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, पुतिन आणि प्रीगोझिन या दोघांचा जन्म सोव्हिएत युनियनच्या लेनिनग्राड (सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला. सोव्हिएत युनियनच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रीगोझिनने 10 वर्षे तुरुंगात घालवली. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, प्रिगोझिनने नवीन रशियामध्ये रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आणि अफाट संपत्ती कमावली. त्यावेळी पुतिन आणि दोघांमधील जवळीक वाढली. येवगेनीचे रेस्टॉरंटची लोकप्रियता इतकी वाढली की, खुद्द रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी विदेशी पाहुण्यांना या रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे येवगेनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या जवळ आले.

पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…

खाजगी लष्करचा गट तयार
कालांतराने येवगेनीने खासगी लष्कराचा गट तयार केला. जो वॅग्नर ग्रुप म्हणून सर्वत्र परिचित आहे. या खासगी सैन्यात निवृत्त लष्करी अधिकारी आणि जवानांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर या ग्रुपमध्ये गुन्हेगारांचाही समावेश असल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला आहे. या ग्रुपला क्रेमलिनकडूनही पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जाते.

हा ग्रुपने सीरिया, लिबिया, माली आणि मध्य आफ्रिकन देशांमध्येही क्रूर मोहीम राबवली असून, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्यावेळी याच ग्रुपचे लढवय्ये आघाडीवर तैनात होते. प्रीगोझिनचा वाढता दबदबा लक्षात घेता त्यांना पुतिन यांचे पुढील उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जात होते. मात्र, आता येवगेनीने बंडाचा बिगुल फुंकून पुतिन आणि स्वतःच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Tags

follow us