व्यापाऱ्यांनी अडचण सांगताच राम शिंदेंची हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह; सभेतूनच थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन

व्यापाऱ्यांनी अडचण सांगताच राम शिंदेंची हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह; सभेतूनच थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन

Ram Shinde Phone Call : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सध्या देशासह राज्यात मोदी @9 या अंतर्गत भाजकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या मतदार संघात कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये व्यापारी संमेलन घेण्यात आलं. तेव्हा व्यापाऱ्यांनी राम शिंदेना आपली समस्या सांगितली असता त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनाच फोन लावला. (Ram Shinde Phone Call to Bhajvat Karad for Merchants problem )

Nana Patole : नागपूर, भंडाऱ्यानंतर आता सोलापूरातही झळकले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

यावेळी लोकांनी आणि या व्यापाऱ्यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखेची मागणी केली. त्यानंतर यासाठी शिंदेंनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना फोन लावला. त्यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखेची मागणी कराड यांना कोली तर कराड यांनी देखील त्यावर तात्काळ अर्जानंतर सर्व्हे टीम पाठवतो आणि शाखेला मंजुरी देऊन उद्घाटनासाठी येतो असं म्हणात अश्वासनही दिलं.

Breaking News : जयंत पाटील पुन्हा अडचणीत येणार? राजारामबापू सहकारी बॅंकेवर ईडीचा छापा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये 30 मे ला केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सध्या 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अशाच कार्यक्रमांच्या कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये व्यापारी संमेलन घेण्यात आलं. तेव्हा व्यापाऱ्यांनी राम शिंदेना आपली समस्या सांगितली असता त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनाच फोन लावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube