Nana Patole : नागपूर, भंडाऱ्यानंतर आता सोलापूरातही झळकले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Nana Patole : नागपूर, भंडाऱ्यानंतर आता सोलापूरातही झळकले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Nana Patole CM Banner : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. नागपूर, भंडारा डोंबिवली त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापूरातही पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. (Nana Patole Banner of CM in Solapur)

Breaking News : जयंत पाटील पुन्हा अडचणीत येणार? राजारामबापू सहकारी बॅंकेवर ईडीचा छापा

आषाढी वारीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील गिरझणी या गावामध्ये स्थानिक नेत्यांकडून शुभेच्छांचा बॅनर लावण्यात आला. यावर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. यामध्ये सोलापूरातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून दिवसेंदिवस वाढत चाललेली चूरस समोर येत आहे.

अजित पवारांची देखील विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा :

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतचं पक्षाच्या एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. त्यांनी आपल्याला पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे. असं देखील म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील’ असं म्हणत अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलं.

मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न साकारलं, पण ठाकरे 370 कलमची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तसेच लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. पण महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये पाहिजे तसा समन्वय दिसत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube