Download App

Corona : आनंदाची बातमी! कोरोनासंदर्भात WHO ची मोठी घोषणा…

WHO On Corona : गेल्या चार वर्षांपासून कोरोना या आजाराने थैमान घातलं आहे. त्याच्या विविध व्हेरीएंट आणि लाटांनी जगभरात मृत्यूचं तांडव सुरू होत. त्या दरम्यान लसीकरणाने मोठा दिलासा दिला. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात शारिरिक आर्थिक आणि सामाजिक असं सर्वतोपरी नुकसान या कोरोनामुळे झाल्याचं पाहायाला मिळालं.

मात्र आता यावर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तब्बल चार वर्ष जगभरात उलथापालथ केल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आता एक आणीबाणी किंवा महामारी नसून एक सामान्य आजार आहे. त्यामुळे जगभरात दिलासा मिळाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला त्यांच्या आणीबाणी वर्गवारीतून वगळलं आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेची ओढ का? पवारांनी केली पक्ष नेत्यांची मानसिकता उघड

नुकतचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यावेळी मी जगभरात कोव्हिड-१९ आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. अशी शिफारसल माझ्याकडे करण्यात आली. हा सल्ला मी स्विकारला आणि ही घोषणा केली.

Tags

follow us