राऊतांचे काम सुप्रियाताई व अजितदादांमध्ये भांडणं लावायचे; राणेंचा आरोप

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T161030.280

 Nitesh Rane attack On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे पवार कुटूंबियांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यामध्ये भांडणं कशी होतील हे पाहण्याचे काम राऊत करत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी उ्दया सहा तारखेला बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या विषयांवर संजय राऊत सोडून इतर कोणत्याही पक्षांचे नेते बोलत नाही आहेत. ना काँग्रेसचे नेते, ना भाजपचे नेते कोणीही या विषयावर बोलत नाही आहेत. पण राऊत मात्र बोलून व अग्रलेख लिहून राष्ट्रवादीमध्ये भांडणं लावायचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. प्रत्येकाची भूमिका आहे की हा पवार कुटूंबियांचा अंतर्गत विषय आहे. पण इतरांच्या घरात डोकावणे, इतरांच्या घरात भांडणं लावायचे काम राऊत करत आहेत.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं

शकुनी मामा व भांडण लाव्या ही उपमा त्यांना अगदी बरोबर आहे. यांनी पवार साहेबांवर देखील टीका करायला सुरुवात केली आहे. पवार साहेबांनी जे आपल्या पुस्तकात लिहले आहे, त्यावरुन देखील राऊतांनी शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. पवार साहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे काही निरीक्षण नोंदवले आहे. त्यावरुन राऊतांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांमध्ये भांडण लावायला सुरुवात केली आहे, असा आरोप राणेंनी राऊतांवर केला आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

दरम्यान, उद्या 6 तारखेला बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायणे राणे, शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Tags

follow us