‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं

The Keral Story : ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, काँग्रेसने व्होटबॅंकेसाठी दहशतवादाला संरक्षण दिलं, असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज कर्नाटकाच्या बल्लाही इथं झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे.

सत्य कथेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अखेर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन मोदी यांनी भर सभेत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘द केरळ स्टोरी'(The Keral Story movie) हा चित्रपट दहशतवादी कटावर आधारित आहे. हा चित्रपट दहशतवादाचे सत्य दाखवत असून दहशतवाद्यांच्या कटाचा पर्दाफाश करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच दहशतवादावर बनलेल्या आणि दहशतवादी प्रवृत्तींच्या पाठीशी उभ्या असलेल्या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध असून काँग्रेसने व्होटबँकेसाठी दहशतवादाला संरक्षण दिलं, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, दहशतवादावर आधारित असलेला हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथेवरून प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

नाना पटोलेंच्या मनात काय ? ; म्हणाले, राज्यातील घडामोडींसाठी पुढील आठवडा…

हा चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिक फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने याचिक फेटाळून लावल्यानंतर हा चित्रपट अडचणीत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर यूट्यूबने आक्षेप घेत कारवाई केली आहे.

युट्यबवर हा चित्रपट सर्च केल्यानंतर युट्यूबवर एक इशारचिन्ह येत असून हा कंटेंट आत्महत्या आणि आत्महानीशी संबंधित असल्याचा मजकूर येत असल्याचं एका युजरने ट्विट करत म्हंटलंय.

पाऊसामुळे सामना रद्द झाल्यास, फ्रँचायझींना मिळतात ‘एवढे’ कोटी

दरम्यान, येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येतंय. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे, ही सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.

कर्नाटकात सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक घेतल्या, पण त्यांना आपली सत्ता राखण्यात यश येईल की नाही? हे आता येत्या 13 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube