Sharad Pawar Retirement : कोण होणार राष्ट्रवादीचा अध्यक्ष? सस्पेन्स कायम, देशातील प्रादेशिक पक्षांचा इतिहास सांगतो…
who will Ncp Chief history of Chief designation of Regional Parties : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे. जर शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाहीच तर पुढे काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीच्या बैठक पार पडली. मात्र अद्याप देखील राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? याचा सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीने एक ठराव केला आहे. ज्यामध्ये ठराव करण्यात आला आहे. की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनीच रहावं. असा या ठरावात म्हटलं आहे. तर या ठरावावर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सह्या आहेत.
दरम्यान काँग्रेस भाजप या राष्ट्रीय पक्षात मोठी घराणेशाही आहे. पण जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यात तर जणू राजाचा मुलगा राजा अशाप्रकारे कुटुंबाची मालमत्ता म्हणावी अशी घराणेशाही आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवा नेता निवडताना देशातील ही यादी बघावी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षाचा पुढचा नेता कोण असेल हे अगदी सहज कोडे सुटेल. असं सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आपलं मत मांडलं आहे.
त्यामुळे भारतातील प्रादेशिक पक्षांचे संस्थापक आणि त्यांचे उत्तराधिकारी कोण झाले याची खालील यादी हे स्पष्ट करते की, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. दरम्यान लेट्सअप मराठीने एक सोशल मिडीयावर एक पोल घेतला होता. यामध्ये देखील शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लोकांनी पसंती दिली. 50 टक्के लोकांची सुप्रिया सुळेंना पसंती दिली तर 28 लोकांना वाटतं अजित पवारांनी अध्यक्ष व्हावं. यामध्ये 24 तासांत 55 हजार लोकांनी मत नोंदवलं होतं.
भारतातील प्रादेशिक पक्ष संस्थापक आणि त्यांचे उत्तराधिकारी
1) मुफ्ती महमूद सईद (काश्मीर) महेबुबा मुफ्ती (मुलगी)
2) फारुख अब्दुल्ला (काश्मीर) उमर अब्दुल्ला
3) प्रकाशसिंग बादल (पंजाब) सुखबीरसिंग बादल, हरसिमरत कौर (मुलगा व सून)
4) लालूप्रसाद यादव (बिहार) तेजस्वी यादव(मुलगा)
5) रामविलास पासवान (बिहार) चिराग पासवान
6) देवीलाल (हरियाणा) ओमप्रकाश चौताला(मुलगा)
7) चौधरी चरणसिंग (उत्तरप्रदेश) अजितसिंग(मुलगा)
8) मुलायमसिंग यादव (उत्तर प्रदेश)अखिलेश यादव (मुलगा)
9) बिजू पटनायक (ओरिसा) नवीन पटनायक
10) देवेगौडा (कर्नाटक) कुमारस्वामी
11) करुणानिधी (तामिळनाडू) स्टॅलिन(मुलगा)
12) एम रामचंद्रन (तामिळनाडू) जानकी व जयललिता (पत्नी व प्रेयसी)
13) पी ए संगमा (मेघालय) अगाथा संगमा (मुलगी)
14) राजशेखर रेड्डी – जगन मोहन रेड्डी (मुलगा)
15) बाळासाहेब ठाकरे (महाराष्ट्र) – उध्दव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे (मुलगा व पुतण्या व नातू)
16) शरद पवार (महाराष्ट्र) ? (ओळखा पाहू )
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही यादी दिली आहे. त्यांनी या माध्यमातून असं दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.