Download App

सर्व शक्ती पणाला, तरी इराणमध्ये ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या इस्रायलला हुती कमांडर्सला मारण्यात अपयशी का?

Israel आपली सर्व शक्ती पणाला लावूनही हुती कमांडर्सला का मारू शकले नाही? अशावेळी जेव्हा इराणसारख्या देशांमध्ये इस्रायलचे ऑपरेशन यशस्वी झाले.

Why did Israel, despite its successful operation in Iran, fail to kill Houthi commanders despite all its might? : गेल्या काही काळापासून जगभरात अशांतता आहे. इस्रायल आणि हुती बंडखोर यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून हल्ले सुरू आहेत. इस्रायलीच्या हल्ल्यांमुळे हिजबुल्लाह आणि हमासने हल्ले थांबवले आहेत, मात्र हुती बंडखोर अजूनही सक्रीय आहेत. हे हुती बंडखोर आता इस्रायलच्या रडारवर आहेत. सोमवारी 25 ऑगस्ट रोजी इस्रायलने हुती बंडखोरांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली. इस्रायलने हुती लष्करप्रमुख आणि येमेनचे अध्यक्ष यांनाही मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इस्रायलचे लक्ष्य चुकले. इस्रायलच्या या कारवाईत मात्र नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आता समोर आली आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही की, या कारवाईत एकाही हुती कमांडरचा मृत्यू झालेला नाही.आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, इस्रायल आपली सर्व शक्ती पणाला लावूनही हुतीकमांडर्सला का मारू शकले नाही? तेही अशावेळी जेव्हा इराणसारख्या देशांमध्ये इस्रायलचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्सचा आदर्श माता पुरस्कार जाहीर! भंडारी, गितेंसह एकबोटेंचा सन्मान

इस्रायलच्या पदरी अपयश का आले?

इस्रायल हुती कमांडर्सला मारू न शकण्यामागे अनेक कारणे आहेत. हुती सैनिक सामान्यतः अरबी भाषा वापरतात. इस्रायल डिफेन्स फोर्स आणि त्यांचे हेर ही भाषा डीकोड करू शकत नाहीत. अलिकडेच, इस्रायली सरकारने सर्व गुप्तचर अधिकाऱ्यांना अरबी भाषा शिकण्यास सांगितले आहे. हुती सैनिक कोड वर्डमध्ये बोलतात, ज्यामुळे मोसाद किंवा सीआयएचे अधिकारी त्यांच्या कारवाया सहज पकडू शकत नाहीत.

‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी अन् प्रसाद ओक यांच्या अभिनयाची होणार ‘शतकपूर्ती’

इस्रायलची अपूर्ण तयारी

इस्रायलने इराण आणि इतर देशांमध्ये यशस्वी कारवाया करण्यासाठी अनेक वर्षांपासून तयारी केली होती. या हल्ल्यांसाठी हेरांची एक ब्रिगेड तयार करण्यात आली होती. मात्र येमेनमधील हल्ल्याची अजूनही तयारी चालूच आहे. ‘अल अरेबिया’ने इस्रायली सूत्रांचा संदर्भ देत म्हटले आहे की, मोसादचे हेर हुतींसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांची यादी तयार करत आहेत. अहवालात म्हटले आहे की, इस्रायल एकाच वेळी या तळांवर हल्ला करेल. इस्त्राइलकडे हुती लष्करी प्रमुख ‘अल हूती’ वगळता कोणत्याही कमांडरची नोंद नाही. सर्व हुती लोक एक सारखेच आहेत आणि पडद्यामागून ऑपरेशन चालवतात. हुतीचे बंडखोर फक्त इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागतात त्यामुळे त्यांना घेरणे इस्त्राइलला कठिण होते आहे.

मोठी बातमी! पुण्यात भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांचा हल्ला, नक्की काय घडलं?

हुती तळांवर हल्ला

हुती आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने सोमवारी त्यांच्या तीन तळांवर हल्ला केला. पहिला हल्ला राष्ट्रपति भवनाजवळ करण्यात आला. दुसरा हल्ला साना येथील पॉवर स्टेशनवर करण्यात आला. तिसरा हल्ला इंधन साठवणूक सुविधेवर करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ऑपरेशननंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हुतींना किंमत मोजावी लागेल.हुती बंडखोर वारंवार निष्पाप लोकांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. त्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागेल’.

follow us