मोठी बातमी! पुण्यात भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांचा हल्ला, नक्की काय घडलं?

मोठी बातमी! पुण्यात भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांचा हल्ला, नक्की काय घडलं?

Attack on Sadabhau Khot In Pune : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. (Pune) येथे सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेत हा प्रकार घडला. सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात भूमिका मांडत होते. त्याचवेळी कार्यक्रमात घुसून गोरक्षकांनी खोत यांच्यावर हल्ला चढवला. तिथे हजर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात आवाज उठवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून कथित गोरक्षकांना आव्हान देत आहेत. हीच गोष्ट गोरक्षकांना खटकल्याने त्यांनी पुण्यात सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला चढवला. जर सत्ताधारी पक्षातील आमदारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्था राहिलीये कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.

आमच्या आया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा; फडणवीसांच्या आईबाबतच्या चित्रा वाघांच्या आरोपांवरून जरांगे भडकले

राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते, त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात. पोलीस स्टेशनला ही जनावरे गेल्यानंतर ती गोशाळेत नेली जातात. त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जाते. याचा निकाल जर वर्षाने किंवा दीड वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही. त्यामुळे ती जनावरे तो माघारी नेत नाही. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील 10 म्हशी आणि त्याची 11 पाडसे ही पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेत आणण्यात आली होती. आज त्या म्हशी जाग्यावर आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो. पण गोरक्षकांनी त्याला विरोध केला.

दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा दहा म्हशी जबरदस्तीने फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते. तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यानंतर त्या म्हशी गोशाळेत नसल्याच लक्षात आलं.
गोशाळेत या प्रकरणी विचारपूस केल्यावर त्या ठिकाणच्या गोरक्षकांनी उडवाउडवीची दिली. म्हशींना चरायला डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उत्तर गोरक्षकांनी दिले.

याप्रकरणात शेतकऱ्यांची ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती झाली. त्यामुळे या गोरक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू असून त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. यावर सरकारने लक्ष घालून कारवाई करावी. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरुन गोरक्षक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या