Download App

पाकिस्तानला मदत करण्यामागे तुर्कीची मोठी चाल; शस्त्रांस्त्रांचा बाजार अन् पैशांचा खेळ..

सुरुवातीपासूनच पाकिस्तानला साथ दिली. फक्त चीन आणि तुर्की हे दोनच देश असे होते ज्यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला.

Pakistan Turkey Relation : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला भारताने घेतला. ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) थेट पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने मग (Indian Army) पाकिस्तानलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानातील एअरबेस अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले. अन्य ठिकाणावरही हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांत युद्धविराम लागू झाला. पण या सगळ्या घडामोडीत तुर्कीने (Pakistan Turkey Relation) सुरुवातीपासूनच पाकिस्तानला साथ दिली. फक्त चीन आणि तुर्की हे दोनच देश असे होते ज्यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला.

चीनपेक्षा तुर्की अगदी उघडपणे पाकिस्तानच्या समर्थनासाठी उभा होता. इराण किंवा अन्य खाडी देशांनी असा पाठिंबा पाकिस्तानला दिला नाही. मग आता असा प्रश्न समोर येत आहे की फक्त तुर्कीनेच पाकिस्तानला पाठिंबा देण्यामागे नक्की काय कारण आहे. याचेच उत्तर जाणून घेऊ या..

India-Pakistan War : पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह का केला?

तुर्कीचा हेतू नक्की काय

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्यामागे एक वेगळीच चाल आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात तुर्की अतिशय वेगाने स्वतः ला जगात उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. आजमितीस तुर्की जगातील अकरावा सर्वात मोठा डिफेन्स एक्सपोर्टर देश बनला आहे. एका रिपोर्टनुसार सन 2014 ते 2018 या चार वर्षांच्या तुलनेत सन 2019 ते 2023 दरम्यान शस्त्रास्त्रांची निर्यात दुप्पट झाली आहे. म्हणजेच या चार वर्षांच्या काळात देशाच्या डिफेन्स एक्सपोर्टमध्ये तब्बल 106 टक्के वाढ झाली आहे.

हत्यारांच्या क्षेत्रात विस्ताराचा प्लॅन

जगात डिफेन्स एक्सपोर्ट क्षेत्रात फ्रान्स, अमेरिका, रशिया, इटली, दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, स्पेन, इस्राएल आणि ब्रिटन हे दहा देश तुर्कीच्या पुढे आहेत. अशात पाकिस्तानला मदत करणे ही तुर्कीची फक्त रणनीती नाही तर या माध्यमातून तुर्की आपल्या डिफेन्स बाजाराचा विस्तार सुद्धा करत आहे. तुर्कीने सर्वाधिक हत्यारे संयुक्त अरब अमिरात या देशाला विकली आहेत. यानंतर कतर आणि त्यानंतर पाकिस्तानचा नंबर आहे. या गोष्टींचा विचार केला तर भारत पाकिस्तान तणावात तुर्की पाकिस्तानची इतकी मदत का करतोय? पाकिस्तानला इतका पाठिंबा का देत आहे याचा अंदाज येतो.

ब्रेकिंग : भारताला मोठं यश! ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या मेव्हण्यासह ‘टॉप पाच’ दहशतवादी ठार

follow us