Download App

Video : काय सांगता? UAE मध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘भुतनी’ डान्स; काय आहे अल-अयाला?

Women Performed Hair Flipping Ritual To Welcome Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कुठे गेल्यास काही हटके बातमी येणार नाही, असं कधी होतंच नाही. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सौदी अरेबियाच्या (UAE) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Visit) सौदी आणि कतारनंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पोहोचले. तिथं त्यांचं अत्यंत वेगळ्या पद्धतीने (Women Performed Hair Flipping Ritual) स्वागत करण्यात आलं.

ट्रम्प अबू धाबीमधील युएईच्या राष्ट्रपती राजभवनातील कसर अल वतन येथे पोहोचले. ट्रम्प राजभवनात पोहोचताच, पांढऱ्या कपड्यात असलेल्या तरूणींनी केस मोकळे सोडून नृत्य सुरू केलं. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, या तरूणी ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सल्तनतची पारंपारिक कला ‘अल-अयाला’ सादर करत असल्याचं बोललं जातंय. अल-अयाला म्हणजे काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.

अल-अयाला हे नृत्य प्रामुख्याने लग्न समारंभात सादर केले जाते. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सल्तनतमधील लोक उत्सवाच्या प्रसंगी हे नृत्य सादर करतात. अल-अयालामध्ये सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला सहभागी असतात.

तर…निवडणुका स्वबळावर, शिवसेनेचा भगवा फडकवणारच! नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य

व्हायरल दृश्ये काय दाखवतात?

एका व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प युएईच्या राष्ट्रपती भवनातील कसर अल वतन येथे महिलांच्या दोन रांगांमधून चालत आहेत. महिलांनी पांढरे रंगाचे कपडे घातले आहेत, त्यांचे केस लांब आणि काळे आहेत. अमेरिकन अध्यक्ष तेथून जात असताना, महिला त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पुरुषांनी वाजवलेल्या ढोलांच्या तालावर त्यांचे मोकळे सोडलेले केस फिरवत नृत्य करत आहेत.

China Earthquake : चीन पुन्हा हादरला! भूकंपाचे जोरदार धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अल- अयाला म्हणजे काय?
युनेस्कोच्या अहवालानुसार , अल-अयाला हा नृत्य वायव्य ओमान आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमध्ये लोकप्रिय आहे. या पारंपारिक नृत्यात, कविता गायली जाते. नृत्य करताना ढोल वाजवले जातात. युद्धाच्या दृश्याचे अनुकरण करण्यासाठी पुरुष तलवारी किंवा बांबूच्या काठ्या घेऊन एकमेकांसमोर दोन रांगेत उभे असतात. ते संगीताच्या तालावर त्यांचे डोके आणि तलवारी हलवतात. महिला पारंपारिक पोशाख घालून आणि समोर उभ्या राहून नृत्यात भाग घेतात. संगीताच्या तालावर महिला त्यांचे केस एका बाजूला वळवतात.

हे नृत्य कधी सादर केले जाते?
हे नृत्य प्रामुख्याने अल-अयाला लग्न समारंभात सादर केले जाते. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील लोक उत्सवाच्या वेळी देखील सादर करतात. अहवालात स्पष्ट केलंय की, अल-अयालामध्ये सर्व वयोगटातील, लिंगातील आणि सामाजिक वर्गातील लोकांचा समावेश आहे.

 

follow us