Donald Trump Tariff on India : भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं समाधान झालेलं नाही. भारताची आणखी कोंडी करण्याच्या उद्देशाने त्यांनी नवी धमकी दिली आहे. आता तर फक्त आठ तास झाले आहेत. पाहत राहा पुढे काय होतंय ते. अन्य प्रतिबंध देखील लागू केले जाऊ शकतात असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार (India Russia Trade) हेच यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आजपासूनच टॅरिफचा पहिला (Tariff on India) टप्पा लागू होईल त्यानंतर 27 ऑगस्टपासून आणखी 25 टक्के टॅरिफ लागू होईल.
भारताचा रशियाबरोबर व्यापार होत आहे म्हणून भारताला टार्गेट केले जात आहे का, अन्य देशही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत असे पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प यांनी काहीच उत्तर दिलं नाही. उलट म्हणाले की आता तर फक्त आठ तास झाले आहेत पुढे काय होतंय पाहत राहा.
“अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक आता आम्ही..”, टॅरिफ लादल्यानंतर भारताचंही रोखठोक उत्तर
इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ (India Tariff) लावण्याची घोषणा केली होती तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारीच सांगितले होते की मी पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफ वाढवणार आहे.
ट्रम्पची इच्छा आहे की भारताने रशियाकडून (Russia) तेल खरेदी करू नये. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत 24 तासांच्या आता भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला आहे.
रशियन तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा होता; खळबळजनक खुलासा, रशियानेही सुनावलं