China Nepal Relation : जगाला सातत्याने डोकेदुखी ठरणारा देश म्हणजे चीन. या देशाच्या (China News) साम्राज्यवादी धोरणाने अनेक देश हैराण झाले आहेत. भारताला त्रास देण्याचा उद्योग चिनी राज्यकर्ते अनेक वर्षांपासून करत आहेंत. यात पाकिस्तान चीनला मदत करत आहे. चीन भारताविरोधात पाकिस्तानचा (India Pakistan Tension) पाहिजे तसा वापर करून घेत आहे. याआधी अमेरिकेनेही असे उद्योग केले होते. अजूनही अमेरिका पाकिस्तानला मदत करत आहे. परंतु पाकिस्तान आता चीनकडे जास्त झुकला आहे. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशही (Bangladesh) चीनकडे झुकू लागला आहे.
बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील (India Bangladesh Relation) संबंध बिघडले आहेत. भारताविरोधात कारवाया करण्याचे काम बांगलादेशने सुरू केले आहे. यात चीन मदत करत आहे. हे थोडे म्हणून की काय चीनने भारताची आणखी कोंडी करण्यासाठी नवी चाल खेळली आहे. ड्रॅगन आता भारताचा सख्खा शेजारी नेपाळकडे (China Nepal Relation) वळला आहे.
हाँगकाँग मध्ये नुकतीच लाँच झालेली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन (IOMed) संस्थेच्या माध्यमातून चीन एक मंच तयार करत आहे. या माध्यमातून वादांचे समाधान करण्याच्या नावाखाली चीनचा जागतिक प्रभाव वाढवण्याचा रस्ता मोकळा करील. आता नेपाळनेही या संस्थेचा घटक व्हावे असा प्रयत्न चीन करत आहे.
IOMed चा उद्देश जगभरात वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी एक बहुपक्षीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पण जाणकार याला चीनच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा एक भाग मानत आहेत. या संस्थेच्या लॉन्चिंगच्या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री अर्जु राणा देऊबा यांची चर्चा झाली. नेपाळने या संस्थेत लवकरात लवकर सहभागी व्हावे असे वांग यी यांनी यावेळी सांगितले. परंतु नेपाळने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! अमेरिकेत स्टीलच्या आयातीवर दुप्पट टॅरिफ; चीनचा व्यापार थंडावणार
चिनी सरकारी मिडिया शिन्हुआनुसार आतापर्यंत 33 देशांनी या संस्थेचा हिस्सा होण्यासाठी सह्या केल्या आहेत. यात कोणकोणत्या देशांचा सहभाग आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. यावरून असेही स्पष्ट होत आहे की एका रणनितीनुसार चीनने अजून पूर्ण पत्ते उघड केलेले नाहीत. पण इतके मात्र निश्चित आहे की पाकिस्तानप्रमाणेच नेपाळलाही आपल्या बाजूने करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. दक्षिण आशियात अमेरिका आणि भारताचा प्रभाव संतुलित करता येईल असा उद्देश चीनचा आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की त्यांच्या चर्चेत द्विपक्षीय संबंध, विकास सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या संस्थेच्या स्थापनेबद्दल त्यांनी चीनचे अभिनंदन केले. हाँगकाँगमध्ये संस्था स्थापन करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवले. परंतु त्यांनी सदस्यतेच्या मुद्द्यावर स्पष्ट बोलणे टाळले. चीनच्या प्रस्तावावर नेपाळ अजून विचार करत असल्याचे दिसून येत आहे.
चीनने पाकिस्तानला आधीच या संस्थेचा सदस्य देश म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री संस्थेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते. वांग यी यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की ही संस्था ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांसाठी वाद सोडवण्याचा नवा आणि निष्पक्ष पर्याय ठरू शकतो. या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर लक्षात येते की चीनचा खरा उद्देश वाद मिटवणे नाही तर क्षेत्रीय देशांना आपल्या प्रभावाखाली आणणे हा आहे. नेपाळवर टाकला जात असलेला दबाव भारतासाठी रणनितिक इशारा आहे. चीन आता नव्या कूटनितीक शैलीच्या अंतर्गत दक्षिण आशियाला आपल्या पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियाचा मित्र कोण, चीन, भारत की बेलारुस? रशियात झाला सर्वे; भारताला ‘इतक्या’ लोकांचा पाठिंबा