Pakistan News : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात (Pakistan News) तणाव पाहायला मिळत आहे. आता या दोन्ही देशांतील वैर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेचा विचार करून पाकिस्तानने अफगाणिस्तानला मिळणाऱ्या एक प्रमुख हद्द बंद केली आहे. PTI ने दिलेल्या माहितीनुसार एक वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की शनिवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यात आत्मघाती हल्ला झाला होता. तसेच अफगाणिस्तान बॉर्डरला लागून असणाऱ्या प्रांतातील धुमश्चक्रीनंतर गुलाम खाम सीमा बंद करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने सांगितलं, की हल्ल्यानंतर उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुलाम खान सीमा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. या आत्मघाती हल्ल्यात 13 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानच्या बाजूनेच दहशतवादी येतात आणि देशात हल्ले करतात असा आरोप पाकिस्तान बऱ्याच वर्षांपासून करत आहे. तरीही सीमा का बंद केली याची कोणतीही अधिकृत माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अजून तरी दिलेली नाही.
Pakistan Bomb Attack: पाकिस्तानध्ये लष्करी ताफा टार्गेट, आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार
अफगाण सुरक्षा दलांचे प्रवक्ते अबीदुल्ला फारुकी यांनीही पाकिस्तानच्या (Taliban Government) या निर्णयाची खात्री केली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या निर्णयाचं कोणतंही कारण दिलेलं नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सीमेवरील वाहनांना फक्त पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतीय प्रशासनाने सांगितले की गुलाम खान क्रॉसिंगच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितले की हा रस्ता बंद करण्यात येत आहे. आता हा रस्ता पुन्हा केव्हा सुरू होईल याची कोणतीही मुदत दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत हा सीमामार्ग आता बंदच राहणार आहे.
खोस्त प्रांतात स्थित गुलाम खान क्रॉसिंग दोन्ही देशांसाठी महत्वाची आहे. दोन्ही देशांतील व्यापार आणि दळणवळणासाठी महत्वाचा आहे. पाकिस्तानातील उत्तर वजीरिस्तान भागातील मालवाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना विनंती केली आहे या मार्गाने जाऊ नका. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तोरखम किंवा स्पिन बोल्डक यांसारख्या अन्य क्रॉसिंगचा वापर करा.
‘मी खामेनीला मृत्यूपासून वाचवले…’अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा