Download App

पाकिस्तानच्या राजकीय वादात अक्षयच्या ‘केसरी’ची एन्ट्री; इम्रान खानच्या ट्विटनं वेधलं लक्ष

Imran Khan Shares Bollywood Movie Kesari Song : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ हे गाणे ऐकले नसेल असे कुणी सापडणार नाही. इतके हे गाणे लोकप्रिय झाले आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशांतही या गाण्याची क्रेझ पहायला मिळते. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानातही या गाण्याचे दिवाने काही कमी नाहीत. आता तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही हे गाणे शेअर केले आहे.

खान यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला हे गाणे समर्पित करत शहबाज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्याचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाला होता.

वाचा : US Report : पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत 

खान यांचे समर्थक कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शहबाद शरीफ यांच्या घराबाहेर जमा झाले होते. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला. या दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या कार्यकर्त्याच्या मृत्यूने दुःखी होत खान यांनी हिंदी चित्रपट गीतकार मनोज मुंतशिर यांनी लिहिलेल्या तेरी मिट्टी में मिल जावा गाण्याचे लोकल वर्जन शेअर केले.

खान यांनी गाणे शेअर करत कार्यकर्त्याचे कौतुक केले. त्यांच्या मृत्यूवरून लक्षात येते की भ्रष्ट, निर्दयी आणि क्रूर शासक वर्ग किती अहंकारी बनला आहे. खान यांच्या पार्टी प्रवक्त्याने सांगितले की लाठीचार्जमध्ये डोक्यात जखम झाल्याने कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. बारा पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून यातील तिघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

UN मध्ये पाकिस्तानने काश्मीरबाबत पुन्हा सूर आवळला; भारताने फटकारत म्हटलं

सध्या पाकिस्तानातील वातावरण अतिशय अस्थिर बनले आहे. दहशतवादी हल्ले वाढले आहेत. तालिबानबरोबरही वाद सुरू आहेत. त्यात आता देशांतर्गत महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. या संकटातून बाहेर  पडण्यासाठी पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळविण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र, नाणेनिधीने काही अटी टाकल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी लक्झरी वस्तंच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

Tags

follow us