US Report : पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत
America On India-Pak crisis : अमेरिकेच्या (America ) इंटेलिजंस कम्युनिटीने आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये भारत व पाकिस्तान ( India Vs Pak ) या दोन देशांमधील तणावावरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या रिपोर्टमध्ये एक चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यात पाकिस्तान भारतामध्ये एक मोठा हल्ला करु शकते, असे म्हटले आहे.
भारत व पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर ( LOC ) तणाव वाढताना दिसतो आहे. कम्युनिटी रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तानचा भारताच्या विरोधात दहशतवाद्यांचे समर्थन करण्याचा पुर्व इतिहास आहे. यावरुन नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असून यावरुन अमेरिकेने चिंता दर्शवली आहे.
500 कोटींचा घोटाळा दडपण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव; अजितदादांचा गंभीर आरोप
वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये हिंसक संघर्ष होऊ शकतो. काश्मिरमध्ये हिंसक अशांति किंवा भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच सध्याच्या नवी दिल्ली येथील सरकारच्या वागणुकीवरुन असे बोलले जात आहे की, मोदी सरकार या अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर सैन्य कारवाईच्या माध्यमातून देऊ शकते, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी भारताने दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले आहे. उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केली होती. तर पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअरस्ट्रईक करुन दहशतवादी स्थळांना नेस्तनाभूत केले होते.
Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; पंचांमृताद्वारे फडणवीसांनी फुंकले 2024चं रणशिंग!
दरम्यान या रिपोर्टमध्ये भारत-चीन यांच्या तणावपूर्ण संबंधांवर देखील माहिती देण्यात आलेली आहे. दोन्ही देशांच्या सीमेवरील सैन्याची ताकद ही दोन्ही अणु शक्ती असलेल्या देशांमध्ये तणाव वाढवते आहे. भारत व चीन यांच्या सशस्त्र संघर्षानंतर अमेरिकेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.