Download App

Nepal : नेपाळमध्ये ‘चीन’ची एन्ट्री! जुनी युती तुटली; सरकारमध्ये PM प्रचंड अन् चीन समर्थकांची आघाडी?

New Government Alliance in Nepal : नेपाळच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी (New Government Alliance in Nepal) घडल्या आहेत. पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) आणि (Pushpa Kamal Dahal) माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा (Sher Bahadur Deuba) यांच्यातील 15 महिने जुनी युती तुटली आहे. यानंतर आता पीएम दहल चीनी समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्याबरोबर आघाडी करणार आहे. अशा प्रकारने नेपाळच्या राजकारणात पुन्हा चीनने एन्ट्री (China) घेतली असून भारतासाठी ही घडामोड डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ

पंतप्रधान दहल आता माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याबरोबर आघाडी करणार असल्याची माहिती आहे. ओली हे चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. याआधी ते पंतप्रधान होते. त्यांच्याच काळात भारत आणि नेपाळ यांच्यात सीमावाद उफाळून आला होता. चीनच्या राजदूतांच्या इशाऱ्यावरून ओली यांनी एक वादग्रस्त नकाशा जारी केला होता. ज्यात भारताचे काही भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. तरीही केपी शर्मा ओली सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत राहिले.

शेर बहादूर देऊबा भारत समर्थक म्हणून ओळखले जातात. आता ही युती तुटण्यामागे चीनच असल्याच्या चर्चा नेपाळच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. कारण मागील काही दिवसांपासून पंतप्रधान दहल आणि केपी शर्मा ओली यांनी अनेक वेळा चीनी राजदूताच्या भेटी घेतल्या. या भेटींनंतरच देऊबा आणि दहल यांच्या पक्षातील युती संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून पुष्पकमल दहल आणि शेर बहादूर देऊबा गटात वादही सुरू होते.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

चीन नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, सरकारसोबत भारत समर्थक शेर बहादूर देऊबा होते. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या होत्या. सरकारमधून देऊबा गटाला बाहेर काढणे आणि केपी शर्मा ओली यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांत अखेर चीन यशस्वी झाला आहे. आता या राजकारणाचा भारतावर (Nepal India Relation) काय परिणाम होतो, भारत आणि नेपाळमधील संबंध पुन्हा बिघडणार का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

follow us