Rain Tax in Canada from next Month : जगात नेहमीच काहीतरी अजबगजब घडत असते. या गोष्टी कधी निसर्गात तर कधी मानवी जीवनातही घडताना दिसतात. आताही कॅनडा सरकार (Canada) असाच अजब निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे कॅनडावासियांची झोप उडाली आहे. कॅनडा सरकार पुढील महिन्यापासून रेन टॅक्स लागू (Rain Water Tax) करणार आहे. या निर्णयाची घोषणा सरकारने केली आहे. मागील काही वर्षांपासून कॅनडात स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा बनला आहे. या समस्येमुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यही प्रभावित झाले आहे. नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आता सरकारने लोकांच्या खिशावर भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
India Canada : कॅनडाला शहाणपण येईना! ‘त्या’ आरोपांनंतर भारताची चौकशी करणार; नवा वाद काय?
लोकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन शासनाने स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम बांधली आहे. या प्रणालीद्वारे जमा झालेले अतिरिक्त पाणी बाहेर काढले जाईल. कॅनडात नेहमीच मुसळधार पाऊस होत असतो. या पावसामुळे अनेक समस्या निर्माण होतात. इतकेच नाही तर हिवाळ्यात बर्फ वितळल्याने सर्वत्र पाणी पसरते. शहरांत घरांपासू रस्त्यांपर्यंत सर्व काही काँक्रिटचे बनलेले आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. हेच पाणी नंतर रस्त्यांवर वाहू लागते. त्यामुळे रस्ते आणि नाल्यात पाणी जमा होते.
पावसाळ्यात ही समस्या उग्र रुप धारण करते. नाल्यांतून पाणी घरात जाते. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्याचा धोका पसरतो. या पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी टोरंटो प्रशासनाने स्टॉर्मवॉटर चार्ज अँड वॉटर सर्व्हिस चार्ज कन्सल्टेशनबरोबर चर्चा केली आहे. सरकार हा नियम निवासी इमारतींबरोबर कार्यालये, हॉटेल्स इत्यादींमध्ये लागू करण्याच्या विचारात आहे.
सरकारच्या या निर्णयावर नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरी टोरंटोचे नागरिक पाण्यावर कर देत आहेत. अशा स्थितीत वादळ पाणी व्यवस्थापनाचा नवा खर्च त्यांच्यासाठी ताण वाढवणारा ठरणार आहे. नवीन नियम लागू झाल्याने वादळाच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. वादळी पावसाचा फटका ज्या भागात बसतो तेथील नागरिकांना आता जास्तीचा कर द्यावा लागणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. याशिवाय दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या लोकांवरही आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. कारण या भागात जागा कमी असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नाही.
Israel Hamas War : भारताचं मोठं पाऊलं; इस्त्रायल-हमास युद्धविराम नाकारत कॅनडाला दिलं समर्थन