Download App

Video : “मी आत्महत्या करणार नाही”; ‘फायझर’चा गैरकारभार उघड करणाऱ्या मेलिसाचं वक्तव्य

लस निर्मिती करणारी कंपनी फायजरच्या माजी कर्मचाऱ्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pfizer Whistleblower Faces Threat to Life : लस निर्मिती करणारी कंपनी फायझरच्या माजी (Pfizer Vaccine) कर्मचाऱ्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनीची माजी कर्मचारी आणि व्हिसलब्लोअर मेलिसा मॅकएटीने हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत तिने माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मॅकएटी एक व्हिसलब्लोअर आहे जिने फायझरच्या लसींमधील अनियमतता चव्हाट्यावर आणली होती. याबाबतचा एक मेलही लीक केला होता. तसेच मेलिसाने लसीचे घटक आणि मृत्यू यांच्यातील संभाव्य दुव्यांबाबत चिंता व्यक्त केली होती.

या व्हिडिओत मेलिसा म्हणते की मी कधीच आत्महत्या करणार नाही. माझ्या जीवाला धोका आहे. या व्हिडिओत मेलिसाने सांगितले आहे की माझ्या जीवाचे जर काही बरे वाईट झाले तर त्याला सरकार आणि फार्मा कंपनी जबाबदार राहिल असे मेलिसाने या व्हिडिओत म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर फायझर कंपनीत खळबळ उडाली आहे. याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

मी आणि माझ्या परिवारात कोणतेही वाद नाहीत. मानसिक आरोग्याबाबतही काहीच समस्या नाहीत. भविष्यात माझ्यावर जर हल्ला झाला तर यासाठी औषध निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्या आणि सरकार जबाबदार राहिल. मेलिसा एक व्हिसलब्लोअर आहे जिने लस तयार करणारी कंपनी फायझरमधील लसींचा गैरव्यवहार समोर आणला होता. तसेच कंपनीचे काही मेल सुद्धा लीक केले होते. व्हिसलब्लोअर म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या संस्थेत किंवा संस्थेच्या एका विभागातील चुकीच्या गोष्टींविषयी खुलासा करते.

मेलिसाने फार काळजी करण्याची गरज नाही असे अनेकांना वाटते. मर्क अँड कंपनीचे माजी प्रतिनिधी ब्रँडी वॉनचे प्रकरण सर्वांसमोर आहे. वॉन यांनीही लसीविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. यानंतर थोड्याच दिवसात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता आणखी एक व्हिसलब्लोअर प्रकरण समोर आलं आहे.

कोविशल्ड लसीच्या साईड इफेक्टची चर्चा अन् कंपनीने घेतला मोठा निर्णय

मेलिसा यांनी आता जो व्हिडिओ प्रसारित करून वक्तव्य केलं आहे त्यावर अद्याप कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणात आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण एकूणच या प्रकरणाने युरोपीय देशांत मोठी खळबळ उडाली आहे. लस तयार करणाऱ्या प्रथितयश कंपन्यांतही असे गैरकारभार होत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे.

follow us