कोविशल्ड लसीच्या साईड इफेक्टची चर्चा अन् कंपनीने घेतला मोठा निर्णय
AstraZeneca COVID-19 Vaccine : कोरोना काळात कोविशील्ड लस तयार करणाऱ्या अॅस्ट्राजेनेका कंपनीने (AstraZeneca COVID-19 Vaccine) आता एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी जाहीर केले की लसी माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालात कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की मागणीत घट झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार कोरोना महामारीनंतर (Corona Virus) अनेक कोविड प्रतिबंधक लस्सी बनवण्यात आल्या अशा परिस्थितीत दयावत लस बाजारातही उपलब्ध आहेत कंपनीने असेही म्हटले आहे की या कारणामुळे तिच्या वॅक्स ज्वेलिया लस्सीच्या मागणीत घट झाली आहे याच कारणामुळे आता लस तयार होत नाहीत आणि त्याचा पुरवठाही केला जात नाही.
Shreyas Talpade: कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका? अभिनेत्याचा खळबळजनक दावा
कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपनीने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने न्यायालयीन कागदपत्रांमध्ये कबूल केले होते की ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये विकसित केलेली लस दुर्मिळ आणि गंभीर धोका निर्माण करू शकते. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका उद्भवू शकतो. तथापि लस सदोष असल्याच्या वृत्तादरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले होते की लसीचे फायदे जास्त आणि तोटे खूप कमी आहेत. अशा परिस्थितीत कोविशील्ड लसीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. लस सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम असते तर ते लसीकरणानंतर ताबडतोब उघड झाले असते.
अस्ट्रोजेनका कंपनीचे कोविड प्रतिबंधक लस भारतात कोविशील्ड या नावाने ओळखली जाते तर युरोपमध्ये व्हॅक्सजवेरी या नावाने ओळखली जाते. ही एक व्हायरल व्हेक्टर लस आहे. भारतात उत्पादित आणि विपणन केलेले कोविशील्ड देशातील जवळपास 90% भारतीय लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला होता. कोरोना संकटाच्या काळात या लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले होते.
Covishield लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या अन् हार्ट अटॅक! सर्वोच्च न्यायालयात याचिका, कंपनीचीही कबुली?
कंपनीनेच दिली साईड इफेक्टची कबुली
युकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात कोविशिल्ड लस बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेका कंपनीवर गंभीर आरोप केले होते. या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू होत असल्याचा दावा या महिलेच्या कुटुंबियांनी दाखल याचिकेत केला होता. सोबतच या लसीमुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता. कुटुंबियांनी ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर लसीमुळे शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा ‘दुर्मिळ दुष्परिणाम’ होऊ शकतो, अशी कबुली लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने दिली होती.