चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे

चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे

China News : पाच वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं होतं. चीनमधूनच (China News) हा व्हायरस जगभरात पसरला असे सांगितले गेले. आताही अशीच एक धक्कादायक बातमी चीन मधूनच आली आहे. चीनमध्ये सध्या HMPV व्हायरस वेगाने फैलावतो आहे. याबाबत चीनचा आरोग्य विभाग किंवा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी सोशल मीडियावर मात्र चीनमधील दवाखाने फुल्ल झाल्याचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. तसं पाहिलं तर चीनमध्ये साथीचे आजार पसरणे काही नवीन नाही. चीन वेळोवेळी अशा घातक आजारांचा सामना करत असतो. पण चीनमध्येच असे आजार का पसरतात? यामागे कारण तरी काय आहे? याची माहिती घेऊ या..

पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात हाहाकार उडाला होता. यानंतर आणखी एक नवीन व्हायरस वेगाने फैलावत असल्याच्या बातम्या येत आहेत. ह्युमन मेटान्यूमो व्हायरस नावाचा हा व्हायरस सुद्धा कोरोना सारखेच लक्षणे निर्माण करतो. हा व्हायरस लहान मुलांना जास्त त्रासदायक ठरत आहे. चीन जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. हा देश महामारीच्या प्रकोपाचे केंद्र बनला आहे. पण असं का होतं हा खरा प्रश्न आहे. चीनमध्येच असे घातक आजार का उद्भवत आहेत..

चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान, हॉस्पिटल्स फुल्ल; 5 वर्षांनंतर भयावह स्थिती, काय घडलं?

सार्सचा जन्मही चीनचाच

नोव्हेंबर 2002 मध्ये सिवीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजेच सार्स या आजराची सुरूवात झाली होती. वटवाघाळापासून हा आजार सुरू झाला असे मानण्यात येते. यानंतर हा विषाणू मांजरात आला आणि नंतर माणसात फैलावला. यानंतर हा व्हायरस 26 आणखी देशांत पसरला होता. यामध्ये जवळपास 8 हजार लोक संक्रमित झाले आणि 774 लोकांचा मृत्यू झाला होता. जुलै 2023 पर्यंत या व्हायरसवर नियंत्रण मिळवले गेले. तेव्हापासून या व्हायरसने पुन्हा डोके वर काढलेले नाही. चीनने आपल्या सवयी प्रमाणे या आजाराची माहिती दाबण्याचा प्रयत्न केला. यामुळे जगभरातून चीनवर टीकेची झोड उठली होती.

बर्ड फ्ल्यू

AVIAN फ्लू किंवा बर्ड फ्लू एक व्हायरल संक्रमण आहे जे एका पक्ष्यातून दुसऱ्या पक्ष्यात फैलावते. संक्रमित कोंबडी किंवा अन्य पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने हा आजार फैलावतो. विशेषतः कोंबड्यांच्या विविध प्रजातींच्या थेट संपर्कात आल्याने हा आजार माणसांतही फैलावतो. माणसांमध्ये हा व्हायरस तोंड, नाक आणि डोळ्यांच्या माध्यमातून पसरतो. या आजाराचे अनेक स्वरूप प्रदीर्घ काळापासून जगात समोर आले आहेत. पण सध्या प्रचलित असलेला H5N1 सन 1996 मध्ये पहिल्यांदा चीनमध्येच आढळून आला होता.

या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण जवळपास 60 टक्के होते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते बर्ड फ्लू आतापर्यंतच्या घातक आजारांपैकी एक आहे. जगात याचा डेथ रेट 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

चीनमधूनच का पसरतात व्हायरस

चीन महामारीचे केंद्र म्हणून पुढे येण्यास सांस्कृतिक आणि भौतिक कारणे आहेत. यामध्ये दाट लोकसंख्या, जंगली जनावरांचे सेवन आणि अत्याधिक शहरीकरण या कारणांचा समावेश होतो. तज्ज्ञ सांगतात की जगात सध्या मांसाचा व्यापार वेगाने वाढत आहे. जंगलं कमी होत आहेत आणि अॅनिमल फार्मिंग वाढत आहे. यामुळे जंगली जनावरांतील व्हायरस फार्मिंग जनावरांत येत आहेत. येथून पुढे हे व्हायरस मानवी शरीरात दाखल होतात.

सरकार कापणार पेन्शनधारकांचा खिसा; भारताच्या शेजारी आर्थिक तंगी वाढली

व्हायरस फैलावण्याची काही कारणे

1. चीनची लोकसंख्या दीड अब्ज आहे. देशाच्या शहरी भागात प्रचंड लोकसंख्या आहे. अशा वातावरणात आजार लवकर फैलावतात.

2. चीनमध्ये जंगली जनावरांचे मांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. हे जंगली प्राणी अनेक प्रकारच्या व्हायरसचे वाहक असतात. हे घातक व्हायरस माणसांत पसरण्याचा धोका जास्त असतो.

3. चीन मधील वेट मार्केटमध्ये विविध प्रकारच्या जनावरांची विक्री होते. येथे संक्रमण फैलावण्याचा धोका खूप जास्त असतो. मीट मार्केटमध्ये जनावरांचे रक्त आणि मांस यांचा माणसांशी संपर्क होत राहतो. व्हायरस पसरण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे.

4. चीनमध्ये शहरीकरण आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्क अतिशय वेगाने विस्तारत आहे. यामुळे सुद्धा व्हायरस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने फैलावतात. या बरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवास देखील व्हायरसचा प्रसार अन्य ठिकाणी होण्यास हातभार लावतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube