पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

Yale University Research On Corona Variant And Vaccination : कोरोना विषाणूचा हाहाकार शांत झाल्यानंतर आता पुन्हा पाच वर्षांनी कोरोना विषाणूच्या (Corona New Variant) नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. नव्या व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रूग्णांची संख्या झापाट्याने वाढत असून, यामुळे पुन्हा एकदा कोरोना घाबरवू लागला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना सुरू होऊन आता पाच वर्षांचा काळ लोटला आहे. पण अद्याप हा विषाणू पूर्णपणे हद्दपार करण्यात यश आलेले नाही. हा विषाणू दरवर्षी नवीन रूप घेऊन परत येत आहे. मग यात कधी डेल्टा, कधी ओमिक्रॉन आणि आता NB.1.8.1 आणि LF.7. या नव्या विषाणूमुळे अनेकांच्या मनात जसा पाच वर्षात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आले त्याप्रमाणे कोरोनाचे व्हॅक्सिनही (Covid Vaccination) बदलले का? आणि जर हो तर बदललेली व्हॅक्सिन किती प्रभावी आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहे. याच सर्व प्रश्नांवर येल विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
कोरोनाचा नवा व्हेरीएंट अन् भीतीचं वातावरण; JN.1 बद्दल तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
नव्या व्हेरिएंटनं जगाला घाबरवलं
हाँगकाँग आणि सिंगापूरपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या रूग्णसंख्येचा ताण रूग्णालयांवरही दिसून येऊ लागला आहे. एकीकडे नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येत असताना काही ठिकाणी यामुळे काही रूग्णांच्या मृत्युचीदेखील नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सध्या NB.1.8 आणि LF.7 व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून असून, हा व्हेरिएंटला ‘Variants Under Monitoring’ या श्रेणीखाली ठेवले आहे. तर, ICMR ने भारतात आढळून येणाऱ्या रूग्णांमधील JN.1 या विषाणूमुळे घाबरून न जाण्याचे पण आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सध्या भारतात सर्वाधिक आढळून येणाऱ्या रूग्णांमध्ये JN.1 विषाणू आढळून येत असून, यामुळे घाबरण्याचे काही कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
व्हॅक्सिनवर येल विद्यापिठाचं निरीक्षण काय?
येल विद्यापीठाच्या संशोधनानुसार, 2022 पासून दरवर्षी नव्याने अपडेट केलेल्या सर्व व्हॅक्सिन अजूनही कोरोनामुळे होणारे गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी मानल्या जात असल्याचे म्हटले आहे.
सिकल सेल ॲनिमिया 22 वर्षांत होणार हद्दपार, केंद्र सरकारची घोषणा; जाणून घ्या, आजाराचं गांभीर्य..
कोविड व्हॅक्सिन बदलली आहे का?
येलच्या अहवालानुसार, कोविड व्हॅक्सिन दरवर्षी अपडेट केली जात आहे. ज्याप्रमाणे फ्लूचं व्हॅक्सिन दरवर्षी नवीन प्रकारांनुसार बदलले जाते.
2020-21 : मूळ वुहान विषाणूला लक्ष्य करून पहिल्या mRNA व्हॅक्सिन (फायझर आणि मॉडर्ना) आल्या.
2022 : व्हॅक्सिन बायव्हॅलेंट स्वरूपात अद्यतनित केली गेली. मूळ विषाणू + ओमिक्रॉन BA.4/BA.5 प्रकार
2023 : मोनोव्हॅलेंट व्हॅक्सिन आली. फक्त ओमिक्रॉन XBB साठी.
2024-2025 : KP.2 प्रकार लक्षात घेऊन अपडेटेड व्हॅक्सिन तयार करण्यात आली आहे.
येल विद्यापीठातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. स्कॉट रॉबर्ट्स यांच्या मते, प्रत्येक नवीन व्हॅक्सिन हे विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारांशी लढण्यासाठी डिझाइन केलेली असते. गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू रोखण्यासाठी हे प्रभावी आहे.
नवीन व्हॅक्सिन जुन्या व्हेरिएंटवरही काम करते का?
हो, व्हॅक्सिन संसर्ग पूर्णपणे रोखू शकत नाही, परंतु ती गंभीर लक्षणे आणि दीर्घ कोविडचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते. येल मेडिसिनच्या मते, व्हॅक्सिनशननंतर संसर्ग झाला तरी, त्याची लक्षणे सौम्य असतात आणि बरे होण्याचे प्रमाण जलद असते.
तुम्ही दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवता? ‘हा’ गंभीर आजार होण्याची दाट शक्यता
सध्या कोण-कोणते नवी व्हॅक्सिन उपलब्ध?
1. फायझर-बायोएनटेक (कॉमर्नेटी)
– mRNA व्हॅक्सिन
– 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वयोगटांसाठी
– 2024-25 व्हेरिएंटठी अद्यतनित (KP.2)
– 65+ साठी दोन डोसचा सल्ला.
2. मॉडर्ना (स्पाइकव्हॅक्स)
– mRNA व्हॅक्सिन
– सर्व वयोगटांसाठी उपलब्ध
– फायझर सारख्याच शिफारसी
3. नोव्हाव्हॅक्स (नुवाक्सोविड)
– नॉन-एमआरएनए लस, प्रोटिन बेस
– फक्त 65+ वयोगटातील किंवा उच्च-जोखीम गटातील लोकांसाठी
– हे JN.1 व्हेरिएंटसाठी बनवले आहे. परंतु इतर व्हेरिएंटवरदेखील प्रभावी.
कथित कोविड घोटाळा ते बाप चोरला, किरण पावसकरांनी सगळंच काढलं
येल विद्यापीठाच्या मुख्य शिफारसी काय?
– अद्ययावत व्हॅक्सिन घ्या. विशेषतः जर तुमचे वय 65+ असेल किंवा तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल.
– बूस्टर डोस आवश्यक आहे कारण कालांतराने अँटीबॉडीज कमकुवत होतात.
– व्हॅक्सिनेशन करूनही, संसर्ग होऊ शकतो, परंतु तो गंभीर स्वरूप धारण करत नाही.
वैक्सीन बदली है और इसकी जरूरत भी है
कोरोना वायरस बदला है, इसलिए वैक्सीन को भी बदलना पड़ा. येल यूनिवर्सिटी की रिसर्च साफ कहती है- अपडेटेड वैक्सीन अभी भी हमारे सबसे असरदार हथियारों में से एक है. इससे ना सिर्फ गंभीर बीमारी से बचाव होता है, बल्कि लॉन्ग कोविड जैसी जटिलताओं का जोखिम भी घटता है.
हात धुवून मागे लागा, अजितदादाचं तक्रार घेऊन आले पाहिजेत; शाहंच्या कानमंत्राने भुवया उंचावल्या
लस बदलली आणि त्याची गरजही
एकूणच काय तर, कोरोनाने त्याची रूपं बदलली त्याप्रमाणे व्हॅक्सिनदेखील अपडेट कराव्या लागल्याचे ये विद्यापीठाने त्यांच्या संशोधनात म्हटले असून, अपडेटेड व्हॅक्सिन अजूनही सर्वात प्रभावशाली हत्यारांपैकी एक आहे. व्हॅक्सिनमुळे गंभीर आजारांसह दीर्घ कोरोनाची गुंतागुंतीचा धोका देखील कमी होण्यास मदत होते.