सिरमची आणखी एक संजीवनी! कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवण्यात यश

सिरमची आणखी एक संजीवनी! कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवण्यात यश

कोरोनानंतर सिरम इन्टिट्युटने देशाला आणखी एक संजीवनी दिली आहे. कोरोना काळात कोरोना संकटातून देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सिरमने लस तयार केली होती. ही लस सर्व नागरिकांना मोफत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सिरमने अभिमान वाटणारी कामगिरी केली आहे.

सिरमने डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सिरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Actor in BJP : …किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? म्हणत ‘या’ अभिनेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात. त्यामुळे अनेक वर्षापासून सीरम इस्टिट्युटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते.

या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलंय.सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरचं कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube