Actor in BJP : …किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? म्हणत ‘या’ अभिनेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
Actor in BJP : मराठी बिग बॉस फेम मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पक्षामध्ये (Actor in BJP) प्रवेश केला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहीती दिली आहे. हिंदीतील अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींना राजकारणाची वाट धरल्याचं आपण गेल्या काही वर्षांत पाहत आलो आहोत. मात्र गेल्याकाही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पक्षांचं माध्यम निवडलं आहे. त्यामध्ये आता अभिनेता अभिजीत केळकरची देखील भर पडली आहे.
PM मोदींनी फक्त आरोपच नाहीतर चौकशीही करावी; शरद पवारांचं खुलं आव्हान
काय म्हणाला अभिजीत केळकर?
अभिजीतने आपल्या या भाजप प्रवेशावर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहीती देताना लिहिले की, ‘भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश. As they say, you have to be in the system to change it… … किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. असं म्हणत त्याने याबद्दल माहिती दिली आहे.
यावेळी त्याने या कॅप्शनमध्ये कमळाचे फुल देखील टाकले आहेत. तर त्याने यामध्ये आपल्या पक्ष प्रवेशावेळीचा भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत बावनकुळे आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर इतर कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘वंचित’ची ‘इंडिया’ आघाडीत एन्ट्री होणार? काँग्रेससमोरच ठाकरेंनी काय ‘ते’ स्पष्टच सांगितले
प्रिया बेर्डे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये…
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाशिक येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत बेर्डे यांनी हा प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( NCP ) कार्यरत होत्या. पण त्यांनी आता राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला.
प्रिया बेर्डे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बेर्डे यांनी 7 जुलै 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोरंजन क्षेत्राशी निगडित समस्यांवर काम करत होत्या. भाजपामध्ये देखील त्यांच्याकडे मनोरंजन क्षेत्रासंबंधी एखादी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.