कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, नवा व्हेरिएंट किती धोकादायक? ICMR ने दिले महत्त्वाचे अपडेट

  • Written By: Published:
कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, नवा व्हेरिएंट किती धोकादायक? ICMR ने दिले महत्त्वाचे अपडेट

ICMR On Corona virus New Virus : कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा जगातील विविध देशांसह भारतात पाय पसरू लागला असून,  भारतात कोविड १९ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांच्या (India Corona Update) संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे देशात वाढणाऱ्या कोरोनो बाधितांच्या संख्येने अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे. एकीकडे वाढती रूग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण असताना ICMR ने नव्या विषाणूबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्लीसह देशातील केरळ आणि महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे.

धक्कादायक! मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप; शारीरिक, मानसिक छळ, कुटुंब संपवण्याची धमकीही दिली

रूग्णवाढी मागे नवा व्हेरिएंट

भारतात कोविड-१९ च्या वाढीचे कारण NB. १.८.१ आणि LF.७, JN.१ हा नवा प्रकार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेतही नव्या व्हेरिएटंचे रुग्ण आढळून आले असून, हा व्हेरिएंट चीनमध्येही आढळूल आला आहे. त्यानंतर आता याचे रूग्ण आशियातील इतर देशांमध्येही पसरू लागले आहे.

वाढत्या कोरोना प्रकरणांवर आयसीएमआरचे मत काय? 

जगातील इतर देशांसह भारतात वाढणारी कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येवर आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. बहल यांनी सांगितले की, देशात आणि परदेशात आतापर्यंत आढळलेले रुग्ण फारसे गंभीर नसून, भारतात कोविड-१९ चे संसर्ग वाढत आहेत, परंतु ते गंभीर नसल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

 

कुठे किती रूग्ण?

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सध्या महाराष्ट्रात कोविड-१९ मुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटक आणि केरळमध्येही कोरोना बाधित रूग्णाच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजस्थानमधील जयपूरमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात कोविडचे १,००९ रुग्ण आहेत, त्यापैकी केरळ (४३०), महाराष्ट्र (२०९) आणि दिल्ली (१०४) रुग्ण आढळले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube