सावधान! भारतात वेगाने पसरतोय मधुमेह, पण का? ICMR च्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

सावधान! भारतात वेगाने पसरतोय मधुमेह, पण का? ICMR च्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

Diabetes in India : मधुमेह हा एक गंभीर आजार (Diabetes) आहे. या आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहे. हा आजार देशात इतका वेगाने का वाढत चालला आहे याचा शोध घेण्यासाठी ICMR ने नुकताच एक सर्वे केला. भारतीय नागरिकांच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यासाठी कारणीभूत आहेत असे उत्तर सापडले आहे. चला तर मग जाणून घेऊ या डिटेल रिपोर्ट…

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते याचं कारण म्हणजे अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक डायबिटीसचे रुग्ण आहेत. द लँसेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार भारतात आजमितीस 101 मिलियन (जवळपास दहा कोटी) लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर 136 मिलियन लोक प्री डायबिटीसच्या श्रेणीत येतात. म्हणजेच या लोकांना भविष्यात मधुमेहाचा धोका आहे. जर विचार केला तर असा प्रश्न पडतो की शेवटी भारतात इतक्या वेगाने मधुमेहाचे रुग्ण का वाढत आहेत.

गोड पदार्थ खाल्ले की मधुमेहाचा धोका असतो असे सांगितले जाते. परंतु असे नाही. मधुमेह होण्यासाठी आणखीही काही कारणे आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीस रिसर्च फाऊंडेशनने संयुक्त अभ्यास करत मधुमेहाच्या अन्य कारणांचा शोध घेतला आहे. ज्यामुळे मधुमेह होण्याचा सर्वाधिक धोका राहतो.

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चनुसार केक, चिप्स, कुकीज, क्रॅकर, फ्राईड फुड्स, मियोनिज आणि अल्ट्रा प्रोसेस फूड अडवान्स ग्लाईकेशन अँड प्रॉडक्ट्सने (एजीई) भरपूर असतात. यामुळे डायबिटीस होण्याचा धोका जास्त राहतो. एजीईमध्ये अत्यंत घातक घटक असतात जे प्रोटीन आणि लिपिडच्या ग्लाईकेटीडमुळे तयार होतात. या एजीई युक्त खाद्य पदार्थांच्या दीर्घ काळ सेवनाने शरीराला सूज येते. ज्यामुळे मधुमेहाचा आजार जन्म घेतो.

महागाईत दिलासा! अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

एजीई युक्त आहार धोकादायक

या रिसर्चनुसार कमी एजीई युक्त चिप्स, कुकीज यांचे प्रमाण कमी करा. फळे, पालेभाज्या, लो फॅट असलेले दूध आहारात घेतल्याने तुम्ही मधुमेहाचा धोका कमी करू शकता. जास्त साखर, जास्त मीठ आणि जास्त एजीई युक्त आहार अनेक जुन्या आजारांना आमंत्रित करतो. यामध्ये उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि उच्च कोलेस्टेरॉल (High Cholesterol) यांचा समावेश आहे.

लठ्ठपणा ठरतोय धोकादायक

भारतासारख्या विकसनशील देशांत कार्बोहाइड्रेटचे अधिक सेवन केले जाते. यामुळे भारतात लठ्ठपणाची (Obesity) समस्या वेगाने वाढू लागली आहे. लठ्ठपणा सुद्धा मधुमेह, हृदयविकार, हाय कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा धोका वाढवतो. अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत भारतात इन्सुलिन रेजिस्टेंसची समस्या जास्त दिसून येते. यामध्ये शरीरातील ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शरीरात ब्लड शुगरची पातळी वाढते. परिणामी मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढत जातात. लठ्ठपणा आणि ग्लुकोजची पातळी वाढणे हे देखील मधुमेहाची समस्या वाढण्यात सहायक आहेत असे या अहवालात म्हटले आहे.

MUST READ :  Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट

कमी एजीई युक्त आहार घ्या

या रिसर्चमध्ये ३८ लोकांना सहभागी केले होते. या लोकांचे दोन गट करण्यात आले. एका गटाला साधारण १२ आठवडे कमी एजीई युक्त आहार देण्यात आला. तर दुसऱ्या गटातील लोकांना जास्त एजीई युक्त आहार देण्यात आला. यामध्ये तळलेले आणि मसालेदार खाद्य पदार्थांचा समावेश होता. १२ आठवड्यानंतर शोधकरत्यांच्या असे लक्षात आले की हाय एजीई ग्रुप मधील लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टेंसची समस्या दिसून आली. त्यामुळे या लोकांना भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा जास्त धोका दिसून आला.

हिरव्या पालेभाज्या खाणे जास्त फायदेशीर

रिसर्चनुसार फळे, भाजी, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला कमी एजीई युक्त आहार मिळतो. ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी राहतो. तसेच जर तुम्ही अन्न फक्त उकडून खात असाल तरी तुम्ही आहारात एजीईचे प्रमाण कमी राखू शकता. असे असले तरी भारतीयांच्या आहारात या खाद्य पदार्थांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे आज भारतीय नागरिक अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube